मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सावधान! राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत फिरतोय हा खोटा व धोकादायक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज

सावधान! राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत फिरतोय हा खोटा व धोकादायक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज

Jan 12, 2024, 09:16 AM IST

  • Ayodhya Ram Mandir Scam Alert : राम मंदिर उद्घाटनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच आता नागरिकांना फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत.

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir Scam Alert : राम मंदिर उद्घाटनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच आता नागरिकांना फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत.

  • Ayodhya Ram Mandir Scam Alert : राम मंदिर उद्घाटनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच आता नागरिकांना फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत.

रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे १४ जानेवारीपासून अयोध्येत धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. अशातच आता राम मंदिराच्या नावाखाली लुटमार केली जात असल्याचे व खोटारडे मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. राम मंदिराच्या नावाखाली लुटमार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

अयोध्येत १४ ते २२ जानेवारी दरम्यान अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. राम मंदिर उद्घाटनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच आता नागरिकांना फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. 

सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवून २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी व्हीआयपी पास मोफत मिळण्याचा दावा करत आहे. काही मेसेजमध्ये एंट्री पास मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते.

त्या मेसेजमध्ये दावा केला जातो की, राम जन्मभूमी ट्रस्टने सामान्य लोकांना प्राणप्रतिष्ठापणा सोहण्यात सामील होण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. काही मेसेजमध्ये व्हॉट्सॲप युजर्सना एपीके (Android Application Package) फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. काही मेसेजमध्ये व्हीआयपी प्रवेश एक्सेस मिळवण्यासाठी राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान फाईल इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. त्याचबरोबर ही लिंक अन्य लोकांना शेअर करण्यास सांगितली जाते.  सर्व मेसेज जय श्रीराम वाक्याने संपतात.

२२ जानेवारी रोजीच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी केवळ असे लोक उपस्थित राहू शकतात. ज्यांना राम जन्मभूमी ट्रस्टकडून किंवा सरकारकडून रीतसर निमंत्रण मिळाले आहे. अयोध्येतील हॉटेल्स व धर्मशाळातील २२ जानेवारीचे सर्व बुकिंग उत्तर प्रदेश सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत.  केवळ निमंत्रितांसाठी अयोध्येत राहण्याची व्यवस्था करम्यात आली आहे. 

मात्र व्हॉट्सॲप किंवा अन्य सोशल मीडिया ॲपवर येणारे अशा प्रकारचे मेसेज खोटारडे व धोकादायक असू शकतात. यामुळे तुमच्या फोनमधील डेडा चोरीला जाऊ शकतो किंवा फोनमध्ये धोकादायक मालवेअर ॲप्स येऊ शकतात. अशा प्रकारच्या लिंकच्या माध्यातून तुमची वैयक्तिम माहिती चोरीला जाऊ शकते, जसे तुमचा पासवर्ड, बँकिंह डिटेल्स व अन्य प्रकारची माहिती. 

अशा प्रकारच्या लिंकमधून एखादे गेमिंग ॲप गुप्तपणे तुमचा आर्थिक डेटा किंवा फोटो एडिटर तुमच्या डिव्हाइसवर स्पायवेअर एम्बेड करू शकते. लॉगिन क्रेडेन्शियल्स, बँकिंग तपशील तसेच कॉन्टॅक्ट लिस्टसह तुमची वैयक्तिक माहिती चोरी केली जाऊ शकते. अशा प्रकारचे अॅप्स तुमच्या डिव्हाइसच्या माध्यमातून तुमच्यावर पाळत ठेऊ शकते. कॉल रेकॉर्ड करू शकतात आणि कीस्ट्रोक कॅप्चर करू शकतात. 

राम मंदिराच्या नावावर क्यूआर कोड स्कॅम -

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाले असताना अनेक जण रामभक्तांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर क्यूआर कोड पाठवून राम मंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहन केले जात आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी तक्रार विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्याचबरोबर अशा घटनांपासून रामभक्तांनी सावध राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कोणत्याही संस्थेला अशाप्रकारे निधी गोळा करण्यास सांगितलं नसल्याची माहिती रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टने दिली आहे.

पुढील बातम्या