मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Whatsapp: व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा; व्हिडिओ कॉलदरम्यान पैसे चोरीला जाण्याची शक्यता

Whatsapp: व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा; व्हिडिओ कॉलदरम्यान पैसे चोरीला जाण्याची शक्यता

Dec 25, 2023, 06:49 PM IST

    • WhatsApp Screen Share Features: व्हॉट्सअपने नुकतेच स्क्रीन शेअर फीचर्स शेअर लॉन्च केले आहेत.
Whatsapp (PTI)

WhatsApp Screen Share Features: व्हॉट्सअपने नुकतेच स्क्रीन शेअर फीचर्स शेअर लॉन्च केले आहेत.

    • WhatsApp Screen Share Features: व्हॉट्सअपने नुकतेच स्क्रीन शेअर फीचर्स शेअर लॉन्च केले आहेत.

Whatsapp Cyber Security: लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात सर्वाधिक वापरकर्ते आहेत. यामुळे सायबर गु्न्हेगार व्हॉट्सअप कार्यकर्त्यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी एकामागून एक शक्कल लढताना दिसत आहेत. यातच व्हिडिओ कॉलद्वारे अनेकांचे बँक खाते हॅक झाल्याची माहिती आहे. याचपार्श्वभूमीवर व्हॉट्सअप वापरकर्त्यांना स्क्रीन शेअर स्कॅनबद्दल इशारा दिला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

व्हॉट्सअपने नुकतेच स्क्रीन शेअर फीचर लाँच केले आहे, ज्याद्वारे व्हिडिओ कॉलिंगवर डिव्हाइसची स्क्रीन समोरच्या व्यक्तीसोबत शेअर केली जाऊ शकते. मात्र,या फीचरचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेताना दिसत आहेत. व्हॉट्सअप वापरकर्ते जेव्हा त्यांच्या फोनची स्क्रीन एकमेकांना शेअर करतात, त्यावेळी ओटीपी यांसारखी महत्त्वाची माहिती समोरच्या व्यक्तीला दिसत आहे.

सायबर गुन्हेगार व्हॉट्सअप वापरकर्त्यांना नोकरीचे, बक्षिस यांसारखे आमिष दाखवून स्क्रीन शेअर करायला पटवून देतात. सायबर गु्न्हेगार त्यांची ओळख लपवण्यासाठी अनेकदा असे करतात. दरम्यान, व्हॉट्सअप वापरकर्ता रिअल-टाइममध्ये स्क्रीन शेअर करतो, त्यानंतर स्क्रीनवर दिसणारी सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला दिसते. या स्क्रीनद्वारे सायबर गुन्हेगार समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मिळवू शकतात. ज्याद्वारे सायबर गु्न्हेगार व्हॉट्सअप वापरकर्ते समोरच्या व्यक्तीचे पासवर्ड बदलणे लॉक करण्यापासून तर बँक अकाऊंट लॉकपर्यंत अनेक गोष्टी करू शकतात.

व्हॉट्सअॅपच्या नवीन स्कॅनपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सर्व प्रथम कोणत्याही अनोळखी नंबरवरून व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल प्राप्त करण्यासाठी घाई करू नका. याशिवाय, ओटीपी, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही किंवा अशी संवेदनशील माहिती कोणाशीही शेअर करू नका. व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन तेव्हाच शेअर करा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखता आणि स्क्रीन शेअर करणे खूप महत्त्वाचे असते.

विभाग

पुढील बातम्या