मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक.. विमानतळावर पडलेल्या बॅगमध्ये आढळले ७२ साप, १७ किंग कोब्रा अन् ६ माकडं; कस्टम अधिकारीही हादरले

खळबळजनक.. विमानतळावर पडलेल्या बॅगमध्ये आढळले ७२ साप, १७ किंग कोब्रा अन् ६ माकडं; कस्टम अधिकारीही हादरले

Sep 10, 2023, 02:34 PM IST

  • बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत ७२ विदेशी साप आणि ६ मृत कॅपुचिन माकडं आढळली आहेत. 

बॅगमध्ये आढळलेला अजगर

बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत ७२ विदेशी साप आणि ६ मृत कॅपुचिन माकडं आढळली आहेत.

  • बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत ७२ विदेशी साप आणि ६ मृत कॅपुचिन माकडं आढळली आहेत. 

बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला जेव्हा त्यांना एका बॅगमध्ये ७२ साप आणि ६ मृत कॅपुचिन माकडं आढळली. बँकॉकहून आलेल्या विमानाच्या सामानांची तपासणी करताना एका बॅगमध्ये हे प्राणी आढळले. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. बंगळुरू सीमा शुल्क विभागाकडून जारी निवेदनानुसार, बुधवारी रात्री साडे दहा वाजता बँकॉकहून बंगळुरूला आलेल्या फ्लाइट नंबर FD १३७ एअर आशियाहून आलेल्या सामानात ७८ प्राणी आढळले. यामध्ये ५५ बॉल पायथन (वेगवेगळ्या रंगाचे) आणि १७ किंग कोब्रा होते. हे सर्व प्राणी जिवंत होते. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

या बॅगमध्ये ६ मृत कॅपुचिन माकडेही मिळाली आहेत. हे सर्व ७८ वन्यजीव संरक्षण अधिनियम,  १९७२ अंतर्गत अनुसूचित प्राणी आहेत. त्याचबरोबर हे CITES अंतर्गतही लिस्टेड आहेत. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत प्राणी जप्त करण्यात आले. जिवंत प्राणी मूळ देशात पाठवण्यात आले असून मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

चेन्नई विमानतळावरही जप्त केले होते १२ अजगर
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधील चेन्नई विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमधून १२ अजगर जप्त केले होते. अन्ना आंतराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. बँकॉकहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडे ११ बॉल अजगर आणि एक पांढरा अजगर मिळाला. त्याच्याकडे एकूण १२ अजगर जप्त करण्यात आले. सीमा शुल्क अधिनियम १९६२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

विभाग

पुढील बातम्या