मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kerala High Court: पत्नीची अन्य महिलांशी तुलना करणं हा क्रूरपणा - हायकोर्ट

Kerala High Court: पत्नीची अन्य महिलांशी तुलना करणं हा क्रूरपणा - हायकोर्ट

Aug 17, 2022, 11:44 AM IST

    • Kerala High Court On Husband Wife Dispute : पत्नीवर ओरडणं किंवा तिची दुसऱ्या महिलांसोबत तुलना करणं ही क्रुरता असल्याची टिप्पणी हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीत केली आहे.
Kerala High Court Judgement On Husband Wife Dispute (HT_PRINT)

Kerala High Court On Husband Wife Dispute : पत्नीवर ओरडणं किंवा तिची दुसऱ्या महिलांसोबत तुलना करणं ही क्रुरता असल्याची टिप्पणी हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीत केली आहे.

    • Kerala High Court On Husband Wife Dispute : पत्नीवर ओरडणं किंवा तिची दुसऱ्या महिलांसोबत तुलना करणं ही क्रुरता असल्याची टिप्पणी हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीत केली आहे.

Kerala High Court Judgement On Husband Wife Dispute : वैवाहिक जीवनात पतीनं पत्नीची इतर महिलांशी तुलना करणं किंवा तिच्यावर रागावून ओरडणं ही क्रुरता असल्याचं केरळ हायकोर्टानं एका खटल्यात म्हटलं आहे. कौटुंबिक न्यायालयात दिलेल्या निकालानंतर त्याला हायकोर्टात आव्हान देणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयानं विवाहिक कलहांवर ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रेमासाठी कायपण..! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जमले सूत!

Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं धरलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check : अखिलेश यादव यांच्यावर रोड शो दरम्यान बूट व चप्पला फेकल्या की हार अन् फुले?

Viral Video : मुक्या प्राण्यावर क्रूरता! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

एका महिलेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाचे न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि सीएस सुधा यांच्या खंडपीठानं वारंवार पत्नीवर ओरडणं आणि तिची दुसऱ्या महिलांशी तुलना करणं ही क्रुरता असल्याचं म्हटलं आहे, याशिवाय केवळ सुंदर न दिसणं हे घटस्फोटासाठी योग्य कारण नाही, त्यामुळं ज्या वैवाहिक संबंधामध्ये संबंध कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, तिथं घटस्फोट घेतला जाऊ नये, असं म्हणत खटल्यात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे.

काय आहे प्रकरण?

केरळमध्ये एका पतीनं पत्नी इतर महिलांच्या तुलनेत सुंदर दिसत नसल्याचं कारण देत तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हायकोर्टात या केसची सुनावणी झाली. पिडित पत्नीनं पती सुंदर दिसण्याची अपेक्षा पूर्ण नसल्याचं वारंवार सांगत असून तो छळ करत असल्याचं आरोप केला होता. त्यानंतर या खटल्यात सुनावणी करताना कोर्टानं वैवाहिक संबंधावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी केरळच्या हायकोर्टानं बलात्कार पिडितेला २४ महिन्यांच्या आत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. याशिवाय एका खटल्यात महिलेच्या शरीरावर कुठल्याही हेतूनं पुरुषांनी स्पर्श केला असेल तर तो बलात्काराच्या गुन्हात येईल, असंही म्हटलं होतं.

विभाग

पुढील बातम्या