मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JN 1 : कोविड जेएन १ व्हेरिएन्टची लक्षणे सौम्य, घाबरण्याची गरज नाही; सरकारनं केलं आश्वस्त

JN 1 : कोविड जेएन १ व्हेरिएन्टची लक्षणे सौम्य, घाबरण्याची गरज नाही; सरकारनं केलं आश्वस्त

Dec 21, 2023, 01:35 PM IST

  • Central Govt on Covid 19 JN 1: कोविड १९च्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Coronavirus

Central Govt on Covid 19 JN 1: कोविड १९च्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

  • Central Govt on Covid 19 JN 1: कोविड १९च्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Niti Aayog Member VK Paul: निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के पॉल यांनी कोविड १९ चा उपप्रकार जेएन १ च्या वाढत्या प्रकरणांवर महत्त्वाची माहिती दिली. जेएन १ च्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. देशभरात आतापर्यंत जेएन १ प्रकरणांची २१ रुग्ण आढळून आले. कोविड १९ जेएन संपर्कात आलले ९२ टक्के रुग्ण घरातच उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील वैज्ञानिक समुदाय या नवीन प्रकाराचा बारकाईने अभ्यास करत आहे. राज्यांनी चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : डुकराची किडनी लावल्याने जगप्रसिद्ध झालेल्या व्यक्तीचा मृत्यू! दोन महिन्यांपूर्वी झाली होती शस्त्रक्रिया

india iran chabahar port pact : भारत इराणमधील चाबहार करारामुळे अमेरिका संतप्त! आर्थिक निर्बंध लादण्याची दिली धमकी

Sushil Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोविडच्या नव्या प्रकारातील २१ रुग्ण आढळले. यातील १९ रुग्ण गोव्यातील आहेत. तर, केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक-एक रुग्ण सापडला. गेल्या दोन आठवड्यात कोविड १९ शी संबंधित १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यांना गंभीर आजार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले की, "रुग्णांची संख्या वाढत असली तरी ९२.८ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. कोविड १९ मुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही."

केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहेत. या देशातील काही राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी अद्ययावत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासात ६१४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, २१ मे २०२३ पासून सर्वाधिक आहे. देशातील सध्या २ हजार ३११ रुग्ण सक्रीय आहेत.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतेच निवेदन जारी केले. महाराष्ट्रात एक जेएन-१ या व्हेरिएंटचा रूग्ण सापडला आहे. हा रूग्ण सिंधुदुर्ग येथील असून ४१ वर्षाचा पुरूष आहे. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकाेर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला. कोरोनामुळे अनेक देशात बेरोजगारीचे संकट कोसळले. याशिवाय, नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कोरोनाचे नाव काढले तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. यातच कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

विभाग

पुढील बातम्या