मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  corona virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूचा सात राज्यांना विळखा! 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

corona virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूचा सात राज्यांना विळखा! 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

Dec 27, 2023, 08:15 AM IST

    • corona virus new variant total cases : संपूर्ण देशात कोरोना रुग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. नवा विषाणू जेएन १ देशातील सात राज्यात पोहचला असून केरळमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.
coronavirus_main

corona virus new variant total cases : संपूर्ण देशात कोरोना रुग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. नवा विषाणू जेएन १ देशातील सात राज्यात पोहचला असून केरळमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.

    • corona virus new variant total cases : संपूर्ण देशात कोरोना रुग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. नवा विषाणू जेएन १ देशातील सात राज्यात पोहचला असून केरळमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.

corona virus new variant total cases : कोरोना व्हायरस JN.1 या नव्या विषाणूने बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात तब्बल सात राज्यात या विषाणूचे रुग्ण आढळू लागले आहे. बाधित होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. देशात आतापर्यंत नव्या विषाणूची लागण झालेले ८३ रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता वाढू लागली आहे. सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आढळले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sushil Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

Maharashtra Weather update : राज्यात नव वर्षात धुके, थंडीसह पावसाची रिमझिम; असा आहे हवानाचा अंदाज

कोविड-१९ चा सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे. गुजरात मध्ये नव्या विषाणूने बाधित तब्बल ३४ प्रकरणे आढळून आली आहेत. कोविड नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करणारी संघटना INSACOG ने या बाबत माहिती दिली आहे. गुजरात व्यतिरिक्त गोव्यात १८, कर्नाटकातील ८, महाराष्ट्रातील ७, केरळ आणि राजस्थानमधील प्रत्येकी ५, तामिळनाडूमधून ४ आणि तेलंगणात २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

sam pitroda : राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का? महागाई, रोजगार यावर बोला...": काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांची टीका

कोरोना रुग्ण संख्या ही केरळमध्ये वाढतांना दिसत आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये कोरोना संसर्गाचे ४०९ रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोना बंधितांची संख्या ही ४ हजार १७० वर पोहोचली आहे, त्यापैकी ३ हजार ९६ रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये १२२ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर आणि तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मंगळवारी एका ५१ वर्षीय कोरोना संक्रमित महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्या महिलेला आधीच काही आजार होते. अधिकाऱ्याने सांगितले की, मृत सोमकला यांना श्वसनाचा गंभीर त्रास, किडनी आणि विविध अवयव निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गुजरातमध्ये नव्या विषाणूने बाधित रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. केरळमध्ये कोविड -१९ चे सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. परंतु जे.एन. १ विषाणूने बाधित फक्त ५ प्रकरणे आतापर्यंत नोंदवली गेली आहेत. INSACOG डेटा दर्शवितो की नवीन प्रकार JN.१ च्या प्रकरणांमध्ये डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात वाढ झाली आहे. २४ डिसेंबरला २९ नवे कोरोना बाधित आढळून आले होते. ही वाढती रुग्णसंख्या आयमेरिका आणि सिंगापूर सारख्या देशांशी जुळते, जिथे नव्या विषाणूने बाधित सर्वाधिक रुग्ण आहेत.

विभाग

पुढील बातम्या