मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gautam Adani : ‘भारत सरकारनं अदानींना ब्लँक चेक दिलाय; जे हवं ते दिलं जातंय’

Gautam Adani : ‘भारत सरकारनं अदानींना ब्लँक चेक दिलाय; जे हवं ते दिलं जातंय’

Oct 18, 2023, 04:38 PM IST

  • Rahul Gandhi targets Narendra Modi : गौतम अदानी यांच्यावर घोटाळ्याचे नवे आरोप करताना राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

Rahul Gandhi - Gautam Adani - Narendra Modi

Rahul Gandhi targets Narendra Modi : गौतम अदानी यांच्यावर घोटाळ्याचे नवे आरोप करताना राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

  • Rahul Gandhi targets Narendra Modi : गौतम अदानी यांच्यावर घोटाळ्याचे नवे आरोप करताना राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

Rahul Gandhi allegations on Narendra Modi : इंडोनेशियात स्वस्तात मिळणारा कोळसा भारत सरकारला चढ्या दरानं विकून अदानी समूहानं देशातील जनतेची १२ हजार कोटींची लूट केली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एका वृत्तपत्राच्या हवाल्यानं केला. हा आरोप करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ‘अदानी जे काही करत आहेत, ते पंतप्रधानांच्या मर्जीशिवाय हे होऊच शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे,' असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.

ट्रेंडिंग न्यूज

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गौतम अदानी यांच्या गैरकारभाराचे अनेक पुरावे आम्ही दिले आहेत. विदेशातील मीडियात सविस्तर बातम्या येत आहेत. असं असताना नरेंद्र मोदी हे गौतम अदानी यांची व त्यांच्या उद्योग समूहाची चौकशी का करत नाहीत? एकदा नव्हे, अनेकदा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला आहे. आम्ही संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. जाहीर सभांमध्ये बोललो, पत्रकार परिषदांमध्ये बोललो. अदानींमध्ये असं काय आहे की भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही. त्यांना कुठलाही प्रश्न विचारत नाही, अशा प्रश्नांची सरबत्तीच राहुल गांधी यांनी केली.

घोटाळ्याचा आकडा वाढत जाईल!

'घरातील लाइट किंवा पंखा चालू करण्यासाठी बटण दाबलं की अदानींच्या खिशात पैसे जातात. हे सगळं कोण करवतंय? अदानींचं रक्षण कोण करतंय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. भारत सरकारनं अदानींना ब्लँक चेक दिलाय. ते हवं ते करू शकतात. इलेक्ट्रिसिटी, शेती, पोर्ट, एअरपोर्ट जे काही अदानींनी पाहिजे, ते घेऊ शकतात. कुठलीही चौकशी होत नाही. आतापर्यंत आम्ही ३२ हजार कोटींचा घोटाळा दाखवून दिलाय. हा आकडा आणखी वाढत जाईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

देशातील अनेक राज्यांत विजेवर सबसिडी दिली जाते. आमच्या पक्षाचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये सबसिडी दिली गेलीय. मध्य प्रदेशात आम्ही देणार आहोत. इकडं आम्ही लोकांना दिलासा देत असताना अदानी चढ्या भावानं कोळसा विकतायत. वीज बिल वाढवतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर एक चकार शब्द बोलत नाहीत. पंतप्रधानांच्या संरक्षणाशिवाय हे होऊच शकत नाही. दुसरा कुणीही व्यक्ती हे करू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी यावर भूमिका मांडायला हवी', असं राहुल गांधी म्हणाले.

‘इंडिया’चं सरकार आल्यास अदानींची चौकशी होणार!

'देशात आमचं सरकार आल्यास गौतम अदानी यांची चौकशी नक्की केली जाईल. हा केवळ अदानींचा प्रश्न नाही. हे ३२ हजार कोटी देशातील जनतेच्या खिशातून चोरी केले गेले आहेत. अशी चोरी जो कोणी करेल त्याची चौकशी होणारच, असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.

पुढील बातम्या