मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PFI नंतर आता RSS वरही बंदी घालण्याची मागणी

PFI नंतर आता RSS वरही बंदी घालण्याची मागणी

Sep 28, 2022, 03:27 PM IST

    • PFI Banned: केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे. मात्र त्यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घाला अशी मागणी कऱण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

PFI Banned: केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे. मात्र त्यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घाला अशी मागणी कऱण्यात आली आहे.

    • PFI Banned: केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे. मात्र त्यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घाला अशी मागणी कऱण्यात आली आहे.

PFI Banned: केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर हिंसाचार आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत बंदीची कारवाई केली आहे. पाच वर्षांसाठी संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे. मात्र त्यासोबतच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घाला अशी मागणी कऱण्यात आली आहे. राजद प्रमुख लालु प्रसाद यादव यांनी आरएसएसवर बंदीची मागणी केली आहे. याशिवाय काँग्रसने पीएफआय आणि आरएसएस एकसारखेच असल्याचं म्हणत संघावर बंदी घालावी असं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

राष्ट्रीय तपास यंत्रणांनी गेल्या आठवड्याभरात देशातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली. त्यानंतर गृहमंत्रालयाला अहवाल सादर करून पीएफआय संघटनेवर बंदीच्या कारवाईची शिफारस केली. पीएफआयकडून देशाच्या संविधानावर अविश्वास व्यक्त केला जात आहे. तसंच त्यांनी २५ वर्षात देशाला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कट रचला असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. देशात अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्येही पीएफआयचा सहभाग असल्याचं निदर्शनास आले आहे असं तपास यंत्रणेनं म्हटलंय.

पीएफआयवर बंदीनंतर राजद प्रमुख लालु प्रसाद यादव म्हणाले की, पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे. तसंच देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालायला हवी. याआधीही संघावर बंदी घातली गेली होती. पीएफआय, संघ यांसारख्या इतर संघटनांवरही कारवाई व्हावी. हिंदू-मुस्लिम अशी दुफळी माजवणाऱ्यांवर कारवाई करावी. तणाव निर्माण करणे, मशिदींवर भगवा झेंडा लावणे हे चुकीचं आहे. देशात सांप्रदायिकता वाढवून दंगल घडवणे आणि सत्तेत राहणे हा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही लालु प्रसाद यादव यांनी केला.

संघसुद्धा जातीयवाद पसरवतोय, काँग्रेसचा आरोप
काँग्रेसचे लोकसभेतील प्रतोद के सुरशे यांनी म्हटलं की, पीएफआय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्हीही संघटना सारख्याच आहेत. देशभरात संघसुद्धा जातीयवाद पसरवतोय. पीएफआयसारखंच संघावरही बंदीची कारवाई केली पाहिजे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटलं की, आम्ही नेहमीच धर्मांधतेचे विरोधात आहे. द्वेष, धार्मिक कट्टरता आणि हिंसाचाराच्या आधारे समाजात फुट पाडणाऱ्यांचा आम्ही विरोध करतो.

बंदीने प्रश्न सुटेल का?
माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी म्हटलं की, पीएफआयच्या धर्मांध, कट्टरतावादी कारवाया संपुष्टात याव्यात. पण बंदीने हा प्रश्न सुटेल का? धर्मांधता आणि हिंसाचार रोखला पाहिजे. महात्मा गांधीजी यांची हत्या झाल्यानंतर आरएसएसवर बंदी घातली होती. पण त्याने साध्य काय झालं असाही प्रश्न त्यांनी विचारला.

विभाग

पुढील बातम्या