मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pilibhit Marriage : मंडपातून नवरा फरार, धाकट्यानं मारली बाजी; पाहुण्यांनी रचला आगळावेगळा विवाहसोहळा

Pilibhit Marriage : मंडपातून नवरा फरार, धाकट्यानं मारली बाजी; पाहुण्यांनी रचला आगळावेगळा विवाहसोहळा

Feb 09, 2023, 10:37 PM IST

    • Pilibhit Marriage : फेशियल करायला गेलेला नवरा वेळेवर न आल्यामुळं पाहुण्यांनी ऐनवेळी दुसऱ्याच तरुणाशी नवरीचं लग्न उरकल्याची घटना समोर आली आहे.
Pilibhit Uttar Pradesh Marriage Incident (HT)

Pilibhit Marriage : फेशियल करायला गेलेला नवरा वेळेवर न आल्यामुळं पाहुण्यांनी ऐनवेळी दुसऱ्याच तरुणाशी नवरीचं लग्न उरकल्याची घटना समोर आली आहे.

    • Pilibhit Marriage : फेशियल करायला गेलेला नवरा वेळेवर न आल्यामुळं पाहुण्यांनी ऐनवेळी दुसऱ्याच तरुणाशी नवरीचं लग्न उरकल्याची घटना समोर आली आहे.

Pilibhit Uttar Pradesh Marriage Incident : लग्नापूर्वी फ्रेश होण्यासाठी गेलेला नवरा वेळेवर मंडपात न आल्यामुळं संतापलेल्या पाहुण्यांनी दुसऱ्याच तरुणासोबत नवरीचं लग्न लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत शहरात ही घटना घडली असून धाकट्या भावाने होणाऱ्या वहिनीसोबत लग्नगाठ बांधल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. श्याम चौधरी असं लग्नापूर्वी फरार झालेल्या नवऱ्याचं नाव असून आता त्याची पोलिसांकडून शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा, हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील पिलीभीतच्या बिलसंडा गावात श्याम चौधरी या तरुणाचं शेजारच्या गावातील तरुणीशी लग्न जुळलं होतं. काही तासांवर लग्नसोहळा येऊन ठेपलेला असताना फेशियल करण्यासाठी गेलेला श्याम अचानक फरार झाला. त्यामुळं त्यांच्या नातेवाईकांसह पाहुण्यांना काय करावं काही समजत नव्हतं. त्यानंतर त्यांनी नवरीच्या घरच्यांना याबाबतची माहिती देत होणाऱ्या नवरदेवाच्या भावाला तातडीनं लग्नासाठी तयार केलं. तरुणानं होकार दिल्यानंतर सर्वसंमतीनं ठरलेल्या वेळेवर मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा उरकण्यात आला. यावेळी दोन्हीकडच्या पाहुण्यांसह स्थानिकांनीही मोठ्या संख्येनं लग्नाला हजेरी लावली. या लग्नाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लग्नसोहळा उरकल्यानंतर फरार झालेल्या श्यामच्या नातेवाईकांनी पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्यामची शोधमोहिम सुरू केली. त्यानंतर घटनेच्या दोन दिवसांनंतर श्यामने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नसोहळा उरकल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर श्याम घरी परतल्यावर नातेवाईकांनी त्याला घरात घेतलं नाही. त्यामुळं आता या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

पुढील बातम्या