मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विद्यार्थ्यांनी भरलेली बोट तलावात उलटली; १६ मृतदेह काढले बाहेर, १४ मुलांसह दोन शिक्षकांचा बुडून मृत्यू

विद्यार्थ्यांनी भरलेली बोट तलावात उलटली; १६ मृतदेह काढले बाहेर, १४ मुलांसह दोन शिक्षकांचा बुडून मृत्यू

Jan 18, 2024, 07:45 PM IST

  • vadodara boat accident : वडोदरा येथील हरणी तलावात बोट बुडाल्याने एका खासगी शाळेतील १४ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Boat Capsizes in Gujarat

vadodara boat accident : वडोदरा येथील हरणी तलावात बोट बुडाल्याने एका खासगी शाळेतील १४ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

  • vadodara boat accident : वडोदरा येथील हरणी तलावात बोट बुडाल्याने एका खासगी शाळेतील १४ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील वडोदरा येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. शहरा लगतच्या हरणी तलावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.  यामध्ये १४ विद्यार्थी व २ शिक्षकांचा समावेश आहे. या बोटीवर एका खाजगी शाळेतील २३ विद्यार्थी व चार शिक्षक होते. त्यांना लाईफ जॅकेट न घालता बसवण्यात आल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात १३ मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे. बोटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाइफ जॅकेट घातले नसल्याचे समोर आले आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बोटीत इतर कोणतीही व्यवस्था नसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील जखमींना तातडीनेजवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरुवातीला ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र आता तलावातून १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे.

बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार देण्याचे निर्देश राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत मृतांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तलावात बुडून मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी मीप्रार्थना करतो. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो.

विभाग

पुढील बातम्या