मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal: अण्णांचा बोलविता धनी भाजप; केजरीवाल यांचे 'एक तीर दो निशाने'

Arvind Kejriwal: अण्णांचा बोलविता धनी भाजप; केजरीवाल यांचे 'एक तीर दो निशाने'

Aug 31, 2022, 03:32 PM IST

    • Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारवर पत्राद्वारे केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे. 
Arvind Kejriwal - Anna Hazare

Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारवर पत्राद्वारे केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे.

    • Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारवर पत्राद्वारे केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे. 

Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाला विरोध करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रावर केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतीय जनता पक्ष अण्णा हजारे यांना आमच्या सरकारविरोधात बोलायला लावत आहे,’ असा थेट आरोप केजरीवाल यांनी केला आहे. या निमित्तानं केजरीवाल यांनी भाजपसोबत अण्णांनाही लक्ष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. हे धोरण राबविताना घोटाळा झाल्याचा आरोप करत सीबीआयनं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर व कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामुळं आप व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्ली सरकारच्या धोरणांवर टीका केली. दिल्ली सरकारच्या धोरणामुळं दिल्लीच्या गल्लीगल्लीत दारूचा सुकाळ होईल. त्यातून भ्रष्टाचार वाढेल,' असं अण्णा म्हणाले होते. दारूच्या नशेत माणूस जसा धुंद होतो, तसेच केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद झाले आहेत, असंही अण्णांनी म्हटलं होतं. 

अण्णा हजारे यांच्या या पत्रावर केजरीवाल यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. 'जेव्हा-केव्हा आमच्याशी सामना करण्यासाठी विरोधकांकडे मुद्दे नसतात, त्यावेळी ते तिसऱ्याच व्यक्तीला आमच्याविरुद्ध उभे करतात. दिल्ली सरकारच्या विरोधात आता त्यांनी सीबीआयचा वापर करून पाहिला. मात्र, सीबीआयला आमच्या विरोधात काहीच सापडलेलं नाही. आम्हाला क्लीन चिट मिळतेय व लोकांचा पाठिंबा वाढतोय हे लक्षात येताच अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर निशाणा लावला जातोय. आम्हाला बदनाम करण्यासाठीच हे सगळं केलं जातंय, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी भाजपचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख स्पष्ट होता. भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधतानाच अण्णा हजारे यांचा राजकीय वापर होत असल्याचंही त्यांनी सूचित केलं.

देशात यूपीए सरकार असताना अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या आंदोलनात केजरीवाल हे सर्वात आघाडीवर होते. या आंदोलनामुळं प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही सहकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यानंतर अण्णा हजारे व केजरीवाल यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

विभाग

पुढील बातम्या