मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला अन् चोर 15 किमीपर्यंत लटकला; VIDEO VIRAL

रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला अन् चोर 15 किमीपर्यंत लटकला; VIDEO VIRAL

Sep 16, 2022, 10:55 AM IST

    • Mobile Thief Viral Video: रेल्वेच्या खिडकीतून चोरी करणाऱ्या चोराचा हात प्रवाशाने धरल्यानं चोर एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत खिडकीला लटकून होता. जिवाच्या भितीने हात सोडू नका अशी विनवणी त्यानं प्रवाशांकडे केली.
मोबाईल चोराला प्रवाशाने घडवली अद्दल, बिहारमधला व्हिडीओ व्हायरल

Mobile Thief Viral Video: रेल्वेच्या खिडकीतून चोरी करणाऱ्या चोराचा हात प्रवाशाने धरल्यानं चोर एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत खिडकीला लटकून होता. जिवाच्या भितीने हात सोडू नका अशी विनवणी त्यानं प्रवाशांकडे केली.

    • Mobile Thief Viral Video: रेल्वेच्या खिडकीतून चोरी करणाऱ्या चोराचा हात प्रवाशाने धरल्यानं चोर एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत खिडकीला लटकून होता. जिवाच्या भितीने हात सोडू नका अशी विनवणी त्यानं प्रवाशांकडे केली.

Mobile Thief Viral Video: रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा चोरीच्या घटना घडतात. चोर हातोहात एखादी वस्तू लंपास करतात. स्टेशनवर गाडी उभा असताना मोबाईल चोरीचे प्रकार अनेकदा घडले आहेत. आता मात्र असाच चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला चांगलीच अद्दल घडली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खिडकीतून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोराचा हात आतल्या प्रवाशाने पकडला. त्यानंतर ट्रेन सुरु झाल्यानंतर चोर तसाच खिडकीला लटकला होता. जवळपा १५ किमीपर्यंत चोर तशाच अवस्थेच लटकून होता.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्यानतंर प्रवाशाने त्या चोराचा हात जोरात ओढून धरला. यामुळे चोराला काहीच हालचाल करता आली नाही. तेवढ्यात ट्रेनही सुरू झाली. यानंतर चोर खिडकीलाच लटकला. ट्रेन सुरु झाल्यावर चोर घाबरला. तेव्हा त्याने जीवाच्या भितीने आता माझा हात सोडू नका अशी विनवणी केली. प्रवाशांनी चोराला पुढचं स्टेशन येईपर्यंत तसाच धरून ठेवला. याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातली ही घटना असून साहेबपूर कमाल स्थानकापासून ते खागरिया स्थानकादरम्यान ही घटना घडली. साहेबपूर कमाल स्थानकातून गाडी निघाल्यानंतर चोराने खिडकीतून मोबाईल चोरीचा प्रयत्न केला. मात्र फलाट संपण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत असलेल्या या चोराचा हा प्रवाशाने धरला. तेव्हा रेल्वेत त्या प्रवाशासोबत असल्या इतर सहप्रवाशांनीही चोराला ओढून धरला. यामुळे पुढे खिडकीला लटकलेला चोर माफी मागू लागला. तसंच हात मोडेल किंवा खाली पडून जीव जाईल असंही म्हणताना दिसतोय.

जवळपास १५ किमी खिडकीला लटकल्यानंतर पुढच्या स्थानकावर खागरिया इथे चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चोराचे नाव पंकज कुमार असे आहे. तो साहेबपूर कमाल इथल्या पोलिस स्थानक परिसरात राहत असल्याचं समोर आलं आहे. चोराला अद्दल घडल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

विभाग

पुढील बातम्या