मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राहुल गांधींना पाहून रडायला लागली मुलगी, पाहा भारत जोडो यात्रेतील हा VIDEO

राहुल गांधींना पाहून रडायला लागली मुलगी, पाहा भारत जोडो यात्रेतील हा VIDEO

Sep 28, 2022, 04:57 PM IST

    • व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटीझन्सनी कमेंट केली आहे. एकाने लिहिले आहे की, अशा प्रतिक्रिया सामान्यपणे चित्रपट अभिनेते किंवा पॉपस्टारसाठी दिल्या जातात. मात्र एखाद्या राजकीय नेत्यासाठी अशा प्रतिक्रिया विरळ असतात.
राहुल गांधी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटीझन्सनी कमेंट केली आहे. एकाने लिहिले आहे की, अशा प्रतिक्रिया सामान्यपणे चित्रपट अभिनेते किंवा पॉपस्टारसाठी दिल्या जातात. मात्र एखाद्या राजकीय नेत्यासाठी अशा प्रतिक्रिया विरळ असतात.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी राहुल गांधी यांना भेटल्यावर आपले अश्रू रोखू शकत नाही. कधी ही मुलगी आनंदाने भारावून जाते तर कधी रडायला लागते. राहुल गांधीही मुलीला जवळ घेऊन तिला शांत करतात.

ट्रेंडिंग न्यूज

संतापजनक.. धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार, जखमी अवस्थेत व फाटक्या कपड्यात पीडिता पोहोचली पोलीस ठाण्यात

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

हा व्हिडिओ युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, राहुल गांधी अन्य काँग्रेस नेत्यांबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये चालत आहेत. दरम्यान दोन मुली राहुल गांधी यांच्या जवळ येतात आणि भावुक होऊन रडू लागतात. मुलीला भावनिक होताना पाहून राहुल गांधी तिला जवळ घेऊन तिला शांत करतात.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटीझन्सनी कमेंट केली आहे. एकाने लिहिले आहे की, अशा प्रतिक्रिया सामान्यपणे चित्रपट अभिनेते किंवा पॉपस्टारसाठी दिल्या जातात. मात्र एखाद्या राजकीय नेत्यासाठी अशा प्रतिक्रिया विरळ असतात.

काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज १८ वा दिवस आहे. पदयात्रा आज वायनाड मतदारसंघात प्रवेश करणार आहे. ३,५७०किमी आणि १५० दिवसांची ही यात्रा ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारीपासून सुरूवात झाली आहे. या पदयात्रेचे समापण जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहे.

विभाग

पुढील बातम्या