मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Supreme Court Verdict : सर्वोच्च न्यायालयाने झाप झाप झापल्यानंतर कोश्यारींची प्रतिक्रिया; म्हणाले, “तो निर्णय..” VIDEO

Supreme Court Verdict : सर्वोच्च न्यायालयाने झाप झाप झापल्यानंतर कोश्यारींची प्रतिक्रिया; म्हणाले, “तो निर्णय..” VIDEO

May 11, 2023, 04:25 PM IST

  • Bhagat singh koshyaris : भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही.  राज्यघटनेच्या नियमांच्या आधारे  त्यावेळी मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते.

भगतसिंह कोश्यारी

Bhagatsinghkoshyaris : भगतसिंह कोश्यारीम्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही. राज्यघटनेच्या नियमांच्या आधारेत्यावेळीमी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते.

  • Bhagat singh koshyaris : भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही.  राज्यघटनेच्या नियमांच्या आधारे  त्यावेळी मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते.

Bhagat Singh Koshyari : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक फैसला सुनावला. आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमू्र्तींच्या घटनापीठाने आपला निर्णय देत राज्यातील सरकारला दिलासा दिला. याचवेळी घटनापीठाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. त्यावर आता भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही. राज्यघटनेच्या नियमांच्या आधारे त्यावेळी मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे त्यावर विश्लेषण करणं हे कायदेतज्ज्ञांचं काम आहे. हे माझं काम नाही.असं कोश्यारी म्हणाले.

बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचंय? यासंदर्भात न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही, असं कोश्यारी म्हणाले.

तीन महिन्यांपूर्वीच राज्यपाल पदावरून मी दूर झालो आहे. मी राजकीय मुद्द्यांपासून स्वत:ला वेगळं ठेवलं आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होतं. त्यावर न्यायालयानं निकाल दिला आहे. या निकालावर जे कायद्याचे जाणकार आहेत, तेच प्रतिक्रिया देतील. आता आपण राज्यपाल पदावर नसून राजकीय मुद्द्यांपासून लांब राहातो, असं कोश्यारी म्हणाले आहेत.

पुढील बातम्या