मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bengaluru schools Bomb Threat: बंगळुरुतील ६८ खासगी शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची माहिती

Bengaluru schools Bomb Threat: बंगळुरुतील ६८ खासगी शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची माहिती

Dec 02, 2023, 08:10 AM IST

    • Bengaluru schools Bomb Threat News: बंगळुरुतील ४८ शाळा बॉम्बने उडवून देण्याची माहिती देणारा मेल आल्याने पालकांमध्ये घबराट पसरली.
Bengaluru News (HT)

Bengaluru schools Bomb Threat News: बंगळुरुतील ४८ शाळा बॉम्बने उडवून देण्याची माहिती देणारा मेल आल्याने पालकांमध्ये घबराट पसरली.

    • Bengaluru schools Bomb Threat News: बंगळुरुतील ४८ शाळा बॉम्बने उडवून देण्याची माहिती देणारा मेल आल्याने पालकांमध्ये घबराट पसरली.

Bengaluru Bomb Threat News: बंगळुरुतील ६८ खासगी शाळेच्या आवारात बॉम्ब असल्याचा मेल आल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ शाळेच्या आवारातून बाहेर काढण्यात आले. शाळा प्रशासनाने याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर ते बॉम्ब निकामी पथक आणि तोडफोड नियंत्रण व तपास पथकासह संबंधित शाळांत पोहोचले. संध्याकाळपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. मात्र, या धमकीच्या मेलनंतर पालकांमध्येही घबराट पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

मिळालेल्या माहितीनुसार, kharijites@beeble.com या इमेल आयडीवरून हा मेल आला, बंगळुरुतील खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. बॉम्बची धमकी मिळालेल्या ६८ शाळांपैकी ४८ शाळा शहराच्या हद्दीत आहेत. तर, उर्वरित बंगळूरुच्या ग्रामीण भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती समजताच पालकांमध्ये घबराट पसरली.

एका वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "बंगळुरुमधील ६८ शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती एका इमेलद्वारे मिळाली. यानंतर बॉम्ब निकामी पथक आणि तोडफोड नियंत्रण व तपास पथकासह संबंधित शाळांत पोहोचले. मात्र, त्याठिकाणी पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. गेल्यावर्षीही असाच एक इमेल आला होता, ज्यात बंगळुरुच्या शाळेत बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. मात्र, चौकशीत या अफवा ठरला."

या धमकीच्या मेलनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांनी धमकी मिळालेल्या एका शाळेला भेट दिली. त्यांनी शाळा आणि पोलीस प्रशासनाकडून याबाबत माहिती मिळवली. बंगळुरुतील ६८ शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची बातमी प्रसारमाध्यमांत पाहिली. यानंतर मी काळजीत पडलो. कारण, यापैकी काही शाळा माझ्या घराजवळील आहेत. या शाळांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी घराबाहेर पडलो. पोलिसांना मला धमकीचा मेल दाखवला. प्रथमदर्शनी तो बनावट असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालकांनी घाबरण्याची गरज नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

विभाग

पुढील बातम्या