मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bengaluru Crime: जादा भाड्यावरून वाद पेटला, रिक्षाचालकाने दोन प्रवाशांना चाकूने भोसकले; एकाचा मृत्यू

Bengaluru Crime: जादा भाड्यावरून वाद पेटला, रिक्षाचालकाने दोन प्रवाशांना चाकूने भोसकले; एकाचा मृत्यू

Jun 14, 2023, 06:13 PM IST

  • Bengaluru Rickshaw Driver Kills Passenger: बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षाचालकाने भाड्याच्या वादावरून प्रवाशाची हत्या केली.

Gondia crime news

Bengaluru Rickshaw Driver Kills Passenger: बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षाचालकाने भाड्याच्या वादावरून प्रवाशाची हत्या केली.

  • Bengaluru Rickshaw Driver Kills Passenger: बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षाचालकाने भाड्याच्या वादावरून प्रवाशाची हत्या केली.

Bengaluru Rickshaw Driver Allegedly Stabbed Passengers: बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. जादा भाड्यावरुन रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वाद पेटला. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात बसलेल्या दोन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

मिळालेल्या माहितीनुसार, दोन प्रवासी एका रिक्षातून मॅजेस्टिकवरून यशवंतपूर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघाले. रेल्वे स्थानकावर पोहचल्यानंतर रिक्षाचालकाने ठरल्यापेक्षा जास्त पैसे मागितले. ज्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहचला. यावर संतापलेल्या रिक्षाचालकाने दोन्ही प्रवाशांना चाकूने भोसकले. या घटनेत दोन्ही प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी यातील एकाला मृत घोषित केले. तर, दुसऱ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेले तरुण भाऊ आहेत. अहमद असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अयूब याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. रिक्षाचालक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

विभाग

पुढील बातम्या