मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  bihar fake police station: आख्खं पोलीस स्टेशनच बनावट उभा केलं; रोजंदारीवर पोलीस नेमले आणि…

bihar fake police station: आख्खं पोलीस स्टेशनच बनावट उभा केलं; रोजंदारीवर पोलीस नेमले आणि…

Aug 18, 2022, 12:50 PM IST

  • Fake Police Station In Bihar: अटक करण्यात आलेल्यांनी सांगितले की, त्यांना या कामासाठी दर दिवशी ५०० रुपये मिळायचे. खोट्या पोलिस ठाण्यात दररोज लोक तक्रार घेऊन येत होते.

बिहारमध्ये खोट्या पोलिस स्टेशनचा भंडाफोड

Fake Police Station In Bihar: अटक करण्यात आलेल्यांनी सांगितले की, त्यांना या कामासाठी दर दिवशी ५०० रुपये मिळायचे. खोट्या पोलिस ठाण्यात दररोज लोक तक्रार घेऊन येत होते.

  • Fake Police Station In Bihar: अटक करण्यात आलेल्यांनी सांगितले की, त्यांना या कामासाठी दर दिवशी ५०० रुपये मिळायचे. खोट्या पोलिस ठाण्यात दररोज लोक तक्रार घेऊन येत होते.

Fake Police Station In Bihar: पोलिस असल्याचं भासवून लुटल्याचे प्रकार अनेकदा ऐकले असतील तुम्ही, पण कधी पोलिस स्टेशनच बनावट असल्याचं ऐकिवात आहे का? चित्रपटात नव्हे प्रत्यक्षात असं घडलंय. बिहारच्या बांका शहरात एक बनावट पोलिस स्टेशन उभारलं होतं. बरं फक्त उभारलं नव्हतं तर तिथं पोलिसही होते, रोजंदारीवर आणलेले. बुधवारी सकाळी अनुराग गेस्ट हाउसमधील या बनावट पोलिस ठाण्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये पोलिसांनी वर्दी घातलेल्या खोट्या पोलिसांना अटक केली. तसंच त्यांच्याकडून पिस्तुल आणि इतर खोटी कागदपत्रे जप्त केली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिसांना बांका शहरात एका गेस्ट हाऊसमध्ये बनावट पोलिस स्टेशन असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी गेस्ट हाऊसवर छापा टाकला. यात पोलिस कर्मचाऱ्यांनी अनेकांना अटक केली. यात पोलिस स्टेशनला ठाण्याची प्रभारी असल्याचं सांगणाऱ्या अनिता देवीला अटक केलीय. तिच्याजवळ एक देशी कट्टा सापडला आहे. अनिता देवीने सांगितलं की, तिला हे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिकण्यासाठी दिल होतं. तसंच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सांगण्यावरूनच नियुक्ती केली असल्याचा दावाही तिने केला.

८ महिन्यांपासून प्रकार सुरू


एसपी डॉक्टर सत्य प्रकाश यांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांचे हे रॅकेट बांकामधील एका कार्यालयातून सुरु होतं. इथं पोलिसांच्या वर्दीत असलेल्या काही लोकांना अटक केली आहे. या रॅकेटमधील लोक ग्रामीण भागातील लोकांना पोलिसात नोकरी लावतो असं सांगून पैसे घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना इथे पाठवायचे असंही सांगण्यात येतंय. दरम्यान, गेल्या ८ महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता अशी धक्कादायक माहिती समजते.

अनेक जणांना अटक


गेस्ट हाउसमधील या बनावट पोलिस ठाण्याप्रकरणी फुल्लीडुमर इथल्या रमेश कुमारला अटक केली आहे. तो खोट्या पोलिस स्टेशनमध्ये अकाउंटंटचं काम करायचा. त्याच्याशिवाय सुल्तानगंजच्या खानपूर इथं राहणारी जुली कुमारी हिला ताब्यात घेतलं आहे. तर आकाश कुमार याला पोलिस वर्दी घातलेली असताना पकडण्यात आलं आहे. त्याच्याकडून काही कागदपत्रे जप्त केली आहे. पोलिसांनी जेव्हा या खोट्या पोलिस ठाण्यातील लोकांची चौकशी केली तेव्हा सगळ्यांनी भोला यादव या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून काम करत असल्याचं सांगितलं. भोला यादव हा फुल्लीडुमर इथं राहत असल्याचं ते म्हणाले.

दररोज ५०० रुपये देऊन काम


गेस्ट हाउसमध्ये खोट्या पोलिसवाल्यांच्या खासगी आचाऱ्यालासुद्धा अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्यांनी सांगितले की, त्यांना या कामासाठी दर दिवशी ५०० रुपये मिळायचे. खोट्या पोलिस ठाण्यात दररोज लोक तक्रार घेऊन येत होते. तेव्हा तक्रार घेऊन येणाऱ्यांना आणि ज्यांच्याविरोधात आहे त्यांना घाबरवून, धमकी देवून प्रकरण मिटवत असत.

विभाग

पुढील बातम्या