मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Ram Mandir : योगी सरकारचा मोठा निर्णय.. २२ जानेवारीचे हॉटेल्स व धर्मशाळांतील सर्व प्री-बुकिंग रद्द

Ayodhya Ram Mandir : योगी सरकारचा मोठा निर्णय.. २२ जानेवारीचे हॉटेल्स व धर्मशाळांतील सर्व प्री-बुकिंग रद्द

Dec 21, 2023, 10:53 PM IST

  • Ayadhya Hotels Advance booking Cancel : २२ जानेवारी रोजीचे अयोध्येतील सर्व हॉटेल्स व धर्मशाळांमधील प्री-बुकिंग रद्द करण्यात आले आहे.

Ayodhya Ram Mandir

Ayadhya Hotels Advance booking Cancel : २२ जानेवारी रोजीचे अयोध्येतील सर्व हॉटेल्स व धर्मशाळांमधील प्री-बुकिंग रद्द करण्यात आले आहे.

  • Ayadhya Hotels Advance booking Cancel : २२ जानेवारी रोजीचे अयोध्येतील सर्व हॉटेल्स व धर्मशाळांमधील प्री-बुकिंग रद्द करण्यात आले आहे.

राममंदिर उद्घाटन आणि रामल्ला प्राणप्रतिष्ठापना दिवशी २२ जानेवारी रोजी केवळ आमंत्रित लोकच अयोध्येत येऊ शकतील. यामुळे ज्या भाविकांनी या दिवशी हॉटेल व धर्मशाळांमध्ये प्री- बुकिंगकेली आहे, ती सर्व बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. या दिवशी भारतातील केवळ VVIP लोकच अयोध्यामध्ये येऊ शकणार आहेत. अयोध्या विमानतळावर १०० विमाने येण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Viral News : पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवत होता १७ वर्षीय रॅपर, गोळी झाडली गेल्याने अचानक मृत्यू

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

या दिवशी आमंत्रित लोकांसोबतच सरकारी ड्यूटीसाठी तैनात कर्मचारी व अधिकारी अयोध्येत येऊ शकतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी हे निर्देश अयोध्या जिल्हा प्रशासनाला दिले.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी २२ जानेवारीला लोकांनी अयोध्येत मोठ्या प्रमाणात रुम बुकिंग झाले होते. मात्र आता सर्व बुकिंग रद्द करण्यात आली आहेत.२२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येत राहू शकतील, ज्यांच्याकडे ड्युटी पास किंवा श्री रामतीर्थ ट्रस्टचे निमंत्रण पत्र असेल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी काही लोकांनी स्थानिक हॉटेल आणि धर्मशाळा बुक केल्याचं समोर आलं आहे. सरकार आणि प्रशासनाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती रद्द करावीत, कारण त्यादिवशी भारतातून विशेष निमंत्रित अयोध्येत येणार आहेत.

जवळपास दीड ते दोन लाख नागरिक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. अयोध्येत येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पार्किंग व्यवस्था, लोकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पुढील बातम्या