मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ATS कडून ‘तेहरिक’ व ‘जैश’शी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक, नूपुर शर्मांना मारण्याचा होता कट

ATS कडून ‘तेहरिक’ व ‘जैश’शी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक, नूपुर शर्मांना मारण्याचा होता कट

Aug 12, 2022, 07:45 PM IST

    • स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी यूपी एटीएस पथकाला मोठे यश मिळाले आहे. एटीएसने सहारनपूरमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. एटीएसला सूचना मिळाली होती की, दहशतवाद्यांकडून स्वांत्र्यदिनादिवशी मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे.
‘तेहरिक’ व‘जैश’शी संबंधित दोन दहशतवाद्यांनाअटक

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधीयूपी एटीएस पथकाला मोठे यश मिळाले आहे.एटीएसने सहारनपूरमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.एटीएसलासूचना मिळाली होती की, दहशतवाद्यांकडून स्वांत्र्यदिनादिवशी मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे.

    • स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी यूपी एटीएस पथकाला मोठे यश मिळाले आहे. एटीएसने सहारनपूरमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. एटीएसला सूचना मिळाली होती की, दहशतवाद्यांकडून स्वांत्र्यदिनादिवशी मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत आहे. १५ ऑगस्टच्या दोन दिवस आधीच उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. एटीएसने (ATS)  सहारनपूर येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. एटीएसला माहिती मिळाली होती की, पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून स्वातंत्र्य दिनादिवशीच देशात मोठ्या हल्लाचा कट रचला जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव मोहम्मद नदीम आहे जो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (jaish e mohammed)  आणि तेहरिक -ए-तालिबान (Tehreek e Taliban)  या संघटनांशी संबंधित आहेत. त्याला नूपुर शर्मा (nupur sharma) यांना मारण्याचे काम दिले होते. मात्र त्यांचा कट यशस्वी होण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. तीन दिवसापूर्वीच यूपी एटीएसने (ATS)  केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने ९ ऑगस्ट रोजी एकाला आजमगडमधून अटक केली होती. त्याचे नाव सबाउद्दीन होते.

सबाउद्दीनने आरआरएस नावाने ई-मेल आयडीही बनवली होती. एटीएसचा दावा आहे की, तो सीरियामध्ये राहणारा दहशतवादी अबू बकर अल-शामीच्या संपर्कात होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात होत असलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी आययडी व ग्रेनेड बनवणे व त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तो तरुणांना आकर्षित करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना निशाना बनवण्याचा कट रचत होता. 

विभाग

पुढील बातम्या