मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ashish Nehra : ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच भारतीय क्रिकेटर आशिष नेहरा ट्विटरवर Trending

Ashish Nehra : ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच भारतीय क्रिकेटर आशिष नेहरा ट्विटरवर Trending

Oct 24, 2022, 11:51 PM IST

    • सुनक  (Rishi sunak) यांचे पंतप्रधान म्हणून नाव घोषित होताच, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याचे नाव व फोटो ट्विटरवर ट्रेंडिंग करत असल्याचे दिसून आले.
आशिष नेहरा ट्विटरवर Trending

सुनक (Rishi sunak) यांचे पंतप्रधान म्हणून नाव घोषित होताच, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाजआशिष नेहरा (Ashish Nehra) याचे नाव व फोटो ट्विटरवर ट्रेंडिंग करत असल्याचे दिसून आले.

    • सुनक  (Rishi sunak) यांचे पंतप्रधान म्हणून नाव घोषित होताच, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याचे नाव व फोटो ट्विटरवर ट्रेंडिंग करत असल्याचे दिसून आले.

भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi sunak) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. सुनक यांनी इतिहास रचला आहे. ते पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत, जे इंग्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. इतकेच नाही तरऋषि सुनक ख्रिश्चन बहुसंख्याक असणाऱ्या ब्रिटनमधील पहिले हिंदू तसेच कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले आहेत. पेनी मॉर्डंट यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

इतिहासात पहिल्यांदा भारतीय वंशाचा व्यक्ती इंग्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ऋषी सुनक यांची सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. सुनक यांना १९० हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्याच वेळी, त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट १०० खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्याने शर्यतीतून बाहेर पडल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतील असे सांगितले जात आहे.

सुनक यांचे पंतप्रधान म्हणून नाव घोषित होताच, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे नाव व फोटो ट्विटरवर ट्रेंडिंग करत असल्याचे दिसून आले.

नेटकऱ्यांनी ऋषी सुनक आणि आशिष नेहरा (Ashish Nehra) या दोघांचे फोटो शेजारी-शेजारी लावत भन्नाट मीम्स शेअर केले. या दोघांचा चेहरा जवळपास सारखाच दिसतो असे मत बहुतांश नेटकऱ्यांनी मांडले. तर काहींनी या फोटोंवरून धमाल कमेंट्स पास केल्या. पाहुया काही निवडक ट्विटस..

 

विभाग

पुढील बातम्या