मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  “तुमच्या पक्षातच थांबा, पैसे घ्या, पण काम ‘आप’चं करा"; केजरीवालांचे BJP कार्यकर्त्यांना अजब आवाहन

“तुमच्या पक्षातच थांबा, पैसे घ्या, पण काम ‘आप’चं करा"; केजरीवालांचे BJP कार्यकर्त्यांना अजब आवाहन

Sep 03, 2022, 04:50 PM IST

    • आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही तुमच्या पक्षातच राहा. पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या; पण, काम आम आदमी पक्षाचे करा, असे आगळे वेगळे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.
केजरीवालांचेBJB कार्यकर्त्यांना अजब आवाहन

आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही तुमच्या पक्षातच राहा. पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या; पण, काम आम आदमी पक्षाचे करा, असेआगळे वेगळेआवाहन अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

    • आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही तुमच्या पक्षातच राहा. पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या; पण, काम आम आदमी पक्षाचे करा, असे आगळे वेगळे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

Gujrarat Election : पंजाब विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्वी विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. यावर्षीच डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आपले संपूर्ण गुजरातवर केंद्रीत केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गुजरात निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असली तरी थेट लढत भाजप व आपमध्येच होण्याची चिन्हे आहेत. त्यातच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी, आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही तुमच्या पक्षातच राहा. पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या; पण, काम आम आदमी पक्षाचे करा, असे आगळे वेगळे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

 

केजरीवाल यांनी आज राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना अजब आवाहन केले. केजरीवाल म्हणाले की, आपकडे पैसे नाहीत.आम्हाला भाजपाचे नेते नकोत. त्यांनी ते त्यांच्या जवळ ठेवावेत. आम्हा भाजपाचे जेवढे पन्नाप्रमुख, बुथप्रमुख आहेत, कार्यकर्ते आहेत, गावागावांमधील, तालुक्यांमधील आणि मतदान केंद्रांवरील भाजपा समर्थक आमच्याशी जोडले जात आहेत. यामध्ये अनेक लोक फार चांगले आहेत. त्यांना मी आवाहन करतो. तुम्ही एवढ्या वर्ष भाजपाची सेवा केली, तुम्हाला काय मिळालं? तुमच्या मुलांना शाळा दिल्या का? तुमच्यासाठी रुग्णालये बांधली का? तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर उपाचारांसाठी जमीन किंवा दागिने गहाण टाकावे लागतात की नाही? तुम्हालाही विजेची मोठी बिलं द्यावी लागतात की नाही? असे प्रश्न केजरीवाल यांनी मतदार व तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांना विचारले.

दरम्यान, आमचे सरकार आले की, आम्ही दिल्ली व पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही मोफत वीज देण्यात येईल. आपचे सरकार गुजरातच्या जनतेला २४ तास मोफत वीज देईल. तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभाल्या जातील व त्यामध्ये मोफत शिक्षण देण्यात येईल. आपकडून तुमच्या कुटुंबाला मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा परविण्यात येईल. घरातील महिलांना प्रतिमहिना एक एक हजार रुपये देईन, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.

 

पुढील बातम्या