मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Reliance Jio: रिलायन्स जिओची धुरा नव्या पिढीकडे; आकाश अंबानी झाले अध्यक्ष

Reliance Jio: रिलायन्स जिओची धुरा नव्या पिढीकडे; आकाश अंबानी झाले अध्यक्ष

Jun 28, 2022, 06:10 PM IST

  • रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (Reliance Jio Infocom Ltd) शेअर बाजारात याची माहिती उघड केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी शेअर बाजार (Sare Market) बंद होताच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्याला पाठींबाही दिला आहे.

आकाश अंबानी (हिंदुस्तान टाइम्स)

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (Reliance Jio Infocom Ltd) शेअर बाजारात याची माहिती उघड केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी शेअर बाजार (Sare Market) बंद होताच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्याला पाठींबाही दिला आहे.

  • रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (Reliance Jio Infocom Ltd) शेअर बाजारात याची माहिती उघड केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी शेअर बाजार (Sare Market) बंद होताच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्याला पाठींबाही दिला आहे.

देशातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट घराणं असलेल्या रिलायन्स (Reliance) समूहात आता अंतर्गत सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. रिलायन्स जिओ च्या अध्यक्षपदावरुन (Reliance Jio Chairman) आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पायउतार झाले आहेत. आता त्यांची जागा आकाश अंबानी (Akash Amban) घेणार आहेत. आकाश अंबानींना रिलायन्स जिओ समूहाचं अध्यक्षपद दिलं जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने शेअर बाजारात याची माहिती उघड केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी शेअर बाजार बंद होताच मुकेश अंबानी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्याला पाठींबाही दिला आहे.

असं असलं तरीही जिओ प्लॅटफॉर्म्सलिमिटेडमध्ये अजूनही मुकेश अंबानीच अध्यक्ष राहाणार आहेत. आकाश अंबानी यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे.आपला उत्तराधिकारी निवडण्याचं काम रिलायन्स समूहात पारंपारिकतेनं चालंत आलं आहे.

याशिवाय बोर्डाने रामिंदर गुजराल आणि के. वी. चौधरी यांना कंपनीचे अतिरिक्त अध्यक्ष बनवण्याच्या प्रक्रियेला मंजूरी दिली आहे. हे दोघं आगामी ५ वर्ष स्वतंत्र अध्यक्ष म्हणून कारभारा पाहातील. त्याशिवायही कंपनीने पंकज पवार यांना रिलायन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त केलं आहे. ही नियुक्ती २७ जूनपासीन अमलात आणली गेली आहे. मात्र त्याला शेअरहोल्डर्सची मंजूरी मिळणं अद्याप बाकी आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्लूमबर्गने दावा केला होता की अंबानी आपल्या पुढच्या पीढीला कारभार सोपवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेल ते टेलिकॉमपर्यंत सर्वच बाबतीत आता अंबानी वॉल्टन परिवारासारखंच करणार आहेत असा दावा ब्लूमबर्गने केला होता.

व्यवसायात परिवाराला केंद्रस्थानी ठेवा मात्र वेगवेगळ्या हातात वेगवेगळ्या चाव्या ठेवा असा मूलमंत्र जगातली सर्वात मोठी कंपनी वॉलमार्टचे अध्यक्ष सॅम वॉलमार्ट यांनी दिला होता आता अंबानी परिवारही त्यातच वाटेनं जाताना पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे आगामी काळात मुकेश अंबानीही आकाश अंबानी यांच्या खांद्यावर अंबानी समूहाची धुरा सोपवतील आणि कार्यमुक्त होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुकेश अंबानी यानी गेल्यावर्षी आपले वडील धीरुभाई अंबानी यांच्या जयंतीदिनी आता नेतृत्व बदलाची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. 

 

पुढील बातम्या