मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ''माझी ड्युटी संपली मी विमान उडवणार नाही,'' वैमानिकाच्या भूमिकेमुळे भाजपाच्या ३ खासदारांसह १०० प्रवासी वाऱ्यावर

''माझी ड्युटी संपली मी विमान उडवणार नाही,'' वैमानिकाच्या भूमिकेमुळे भाजपाच्या ३ खासदारांसह १०० प्रवासी वाऱ्यावर

Jul 25, 2023, 10:37 AM IST

    • pilot refuses to fly : राजकोट येथून दिल्लीला जाणाऱ्या एका वैमानिकाची ड्युटी संपल्याने त्याने विमान उडवण्यास नकार दिल्याने तब्बल १०० प्रवासी ताटकळले.
air india HT

pilot refuses to fly : राजकोट येथून दिल्लीला जाणाऱ्या एका वैमानिकाची ड्युटी संपल्याने त्याने विमान उडवण्यास नकार दिल्याने तब्बल १०० प्रवासी ताटकळले.

    • pilot refuses to fly : राजकोट येथून दिल्लीला जाणाऱ्या एका वैमानिकाची ड्युटी संपल्याने त्याने विमान उडवण्यास नकार दिल्याने तब्बल १०० प्रवासी ताटकळले.

राजकोट : राजकोट येथे एक धक्कादायक घटना उघडकिस आली आहे. वैमानिकाची ड्युटी संपल्याने त्याने विमान उडवण्यास नकार दिल्याने तब्बल १०० प्रवासी  आणि ३ भाजप खासदार विमानताळवरच ताटकळले. वैमानिकाच्या भूमिकेमुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार राजकोट विमानतळावर रविवारी घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Ulhasnagar Crime : उल्हासनगर येथे मुथूट फायनान्सच्या भिंतीला भगदाड पाडून दरोड्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे एक विमान राजकोट ते दिल्ली येथे जाणार होते. या विमानात तब्बल १०० प्रवाशी तसेच ३ भाजपचे खासदार होते. प्रवसांसाठी नागरिक दोन तास आधी विमानतळावर आले होते. दरम्यान, विमान उड्डाणाची वेळ आली. यावेळी वैमानिकाने त्याची ड्युटी संपल्याचे सांगत विमान उडवण्यास नकार दिला. यामुळे एकच गोंधळ उडला. विमानाची वेळ उलटूनही विमान न उडल्याने प्रवासी  देखील बेचेन झाले. 

karnatak news : खळबळजनक ! कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी

तब्बल दोन तास प्रवासी विमानात ताटकळले. शेवटी एयर इंडियाच्या अधिकाऱ्यांना धावपळ करत प्रवाशांना दिल्लीला नेण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागली. हा सर्व प्रकार रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. या विमानात राजकोटचे भाजपा खासदार मोहन कुंडारिया, जामनगरच्या खासदार पूनम मादम आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार केसरीदेवसिंह झाला देखील होते. त्यांना दिल्लीला जायचे होते.

या प्रकाराबाबत भाजपा खासदार कुंडारिया म्हणाले, “ड्युटी संपल्याचं कारण देत वैमानिक विमान उड्डाण करण्यास नाही म्हणाला. विमान टेक ऑफ करेल या आशेत आम्ही तब्बल दोन तास विमानात बसून होतो. मात्र, उशीर होत असल्याने आम्ही एयर इंडियाच्या दिल्लीतील अधिकार्‍यांशी संवाद साधला. राजकोट विमानतळावरील या प्रकाराबद्दल तक्रार देखील केली. मात्र, काही उपयोग झाला नाही. शेवटी दोन तास वाट पाहून आम्ही विमानातून खाली उतरलो. या प्रकाराबाबत एयर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. तर विमान तळाच्या अधिकाऱ्यांनी ही एयर लाइनची अंतर्गत समस्या म्हणत हात झटकले आहे.

विभाग

पुढील बातम्या