मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India च्या विमानात मोबाईलचा भीषण स्फोट, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Air India च्या विमानात मोबाईलचा भीषण स्फोट, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Jul 17, 2023, 08:06 PM IST

  • Air india flight : एअर इंडियाच्या विमानात टेकऑफ करताच प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट ४७० मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Air india flight

Air india flight : एअर इंडियाच्या विमानात टेकऑफ करताच प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट४७०मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Air india flight : एअर इंडियाच्या विमानात टेकऑफ करताच प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट ४७० मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

एअर इंडियाच्या विमानाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उदयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार फ्लाईटमध्ये प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट ४७० मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान टेकऑफ  करतानाच प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

रिपोर्टनुसार विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एअरपोर्ट स्टाफ विमानाची तपासणी करत आहेत. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बाहेर आल्यानंतर तीन-चार प्रवाशांनी पुन्हा विमानात चढण्यास नकार दिला. मात्र त्यांना समजावून पुन्हा विमानात बसवण्यात आले.  एअरपोर्ट स्टाफ आणि एअर इंडियाच्या अभियंत्यांनी विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर विमान दिल्लीकडे रवाना झाले.

एअर इंडियाचे विमान क्रमांक-४७० उदयपूरहून नियोजित वेळेनुसार दुपारी १ वाजता दिल्लीकडे निघाले होते. विमानात सुमारे १४० प्रवासी होते. टेकऑफ केल्यानंतर सुमारे १० मिनिटांनंतर फ्लाइटमधील एका प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे विमानात बसलेले इतर प्रवाशी चांगलेच घाबरले.

त्यानंतर विमानाचे पुन्हा उदयपूरच्या दाबोक विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. 

विभाग

पुढील बातम्या