मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air india Offer : एअर इंडियाचा ९६ तासांसाठी बंपर सेल.. रेल्वेच्या तिकीट दरात करा विमानातून प्रवास

Air india Offer : एअर इंडियाचा ९६ तासांसाठी बंपर सेल.. रेल्वेच्या तिकीट दरात करा विमानातून प्रवास

Aug 17, 2023, 04:31 PM IST

  • Air India Special Offer : एअर इंडियाने भन्नाट ऑफर आणली असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीटदरामध्ये कपात केली आहे. ही ऑफर केवळ ९६ तासांसाठी देण्यात आली आहे.

Air India Special Offer

Air India Special Offer : एअर इंडियाने भन्नाट ऑफर आणली असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीटदरामध्ये कपात केली आहे. ही ऑफर केवळ ९६ तासांसाठी देण्यात आली आहे.

  • Air India Special Offer : एअर इंडियाने भन्नाट ऑफर आणली असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीटदरामध्ये कपात केली आहे. ही ऑफर केवळ ९६ तासांसाठी देण्यात आली आहे.

Air India Ticket Sale : टाटा समूहाची विमान कंपनीएअर इंडियाने धमाकेदार ऑफरची सुरुवात केली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही रेल्वेच्या तिकीट दरात विमानातून प्रवास करू शकणार आहेत. एअर इंडियाने आपल्या या खास सेलची सुरुवात केली असून ही ऑफर केवळ ९६ तासांसाठी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

एअर इंडियाने १७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निवदेनात या ऑफरविषयी माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, या ऑफरमध्ये देशांतर्गत कोणत्याही मार्गावरील तिकीटांची किंमत केवळ १, ४७० रुपयांपासून सुरू होत आहे. कंपनीच्या या सेलमध्ये देशांतर्गत सेवेबरोबर आंतरराष्ट्री उड्डाणांवरही स्वस्त दरात तिकिटे मिळत आहे. हा सेल केवळ ९६ तासांसाठी आहे.

एअर इंडियाच्या या ऑफरमध्ये तुम्ही देशांतर्गत विमान प्रवासासाठी इकोनॉमी क्लासचे तिकीट केवळ , ४७० रुपयात मिळवू शकता. तसेच बिझनेस क्लासचे तिकीट १०, १३० रुपयांपासून सुरू होत आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही ऑफर दिली आहे.

एअर इंडियाच्या या खास ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही भविष्यातील प्रवासाचे नियोजन करू शकता. यासाठी जर तुम्ही एअर इंडियाची वेबसाइट किंवा मोबाइल App च्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास कनवेनिएन्स फी लागणार नाही. एअर इंडियाचे फ्लाईंग रिटर्न मेंबर सर्व तिकिटांवर डबल लॉयल्टी बोनसचाही लाभ घेऊ शकतात.

या काळासाठी घेऊ शकता तिकीट -

जर तुम्ही अधिकृत ट्रॅव्हल एजेंट किंवा ऑनलाइन ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून तिकीट बुक करत असाल तरी तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल, मात्र तुम्हाला कनवेनिएन्स फी द्यावी लागेल. एअर इंडियाचा हा विशेष सेल आजपासून सुरू होत असून ही ऑफर २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये तुम्ही १ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या प्रवासाची तिकिटे बुक करू शकता. या दरम्यान ब्लॅकआउट डेट अप्लाय असतील.

 

स्पाइस जेटकडूनही सुरू आहे ऑफर -

एअर इंडियाची ऑफर अशावेळी आली आहे जेव्हा स्पाइस जेट कंपनीकडून इंडिपेन्ड्नस डे सेल सुरू आहे. स्पाइस जेटची सेलही २० ऑगस्टपर्यंत सुरू आहे. स्पाइस जेट सेलमध्ये १,५१५ रुपयांपासून तिकीट बुक करू शकता. या ऑफरमध्ये १५ ऑगस्ट २०२३ ते २० मार्ट २०२४ पर्यंतच्या प्रवासाची तिकिटे बुक करू शकता.

विभाग

पुढील बातम्या