मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nagpur Airport News : प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्याने विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग; भल्या पहाटे विमानतळावर थरार

Nagpur Airport News : प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्याने विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग; भल्या पहाटे विमानतळावर थरार

Aug 03, 2023, 07:16 AM IST

    • Nagpur Airport News : प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्याने विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
air arabia flight emergency landing (HT)

Nagpur Airport News : प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्याने विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    • Nagpur Airport News : प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्याने विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

air arabia flight emergency landing : विमानात प्रवास करत असताना एका ६० वर्षीय प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्याने नागपूर विमानतळावर एका विदेशी विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर अरेबिया कंपनीच्या विमानाची लँडिंग करण्यात आली असून हे विमान शारजाहहून चितगावच्या दिशेने निघालं होतं. परंतु विमानातील एका ६० वर्षीय बांगलादेशी नागरिकाला दोनवेळा रक्ताच्या उलट्या झाल्याने विमानाचं नागपुरातील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. त्यामुळं विमानतळावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

एअर अरेबियाचं विमान शारजाहहून चितगावला निघालं होतं. विमान पहाटे प्रवास करत असतानाच एका प्रवाशाला अचानक त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्याला दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. संबंधित प्रवाशांची प्रकृती आणखी बिघडू नये, म्हणून पायलटने नागपूर विमानतळावरच विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विमानतळ प्राधिकारणाला याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीच्या लँडिंगसाठी परवानगी दिली. त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास एअर अरेबिया कंपनीच्या विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आलं. आजारी प्रवाशाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रवाशावर उपचार केल्यानंतर तब्बल दोन तासांनी म्हणजेच सात वाजता एअर अरेबियाचं विमान चितगावच्या दिशेने झेपावलं.

विमानातून प्रवास करत असलेल्या बांगलादेशी प्रवाशाला गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाच्या विकाराचा त्रास होत होता. तसेच यापूर्वी देखील त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परंतु विमान प्रवास सुरू असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विमानाचं एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यूएईच्या शारजाहहून बांगलादेशच्या चितगावसाठी एअर अरेबियाचं विमान निघालं होतं. या विमानाला कोणतेही थांबे नसल्याने ते थेट चितगावला जाणार होतं. परंतु प्रवाशाला त्रास होत असल्याने विमानाचं नागपूर विमानतळावर एमर्जेन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुढील बातम्या