मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन कप चहा कमी प्या, अर्थव्यवस्था वाचवा; पाकिस्तानी मंत्र्यांंचं आवाहन

दोन कप चहा कमी प्या, अर्थव्यवस्था वाचवा; पाकिस्तानी मंत्र्यांंचं आवाहन

Jun 15, 2022, 09:40 AM IST

    • परकीय चलनाचा पाकिस्तानला तुटवडा भासत असून देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यात आता मंत्र्याने केलेल्या या आवाहनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचे मंत्री अहसान इक्बाल (फोटो - एएफपी)

परकीय चलनाचा पाकिस्तानला तुटवडा भासत असून देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यात आता मंत्र्याने केलेल्या या आवाहनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    • परकीय चलनाचा पाकिस्तानला तुटवडा भासत असून देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यात आता मंत्र्याने केलेल्या या आवाहनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान (Pakistan_ सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय पाकिस्तानकडून करण्यात येत आहेत. सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यानं नागरिकांमध्ये मात्र नाराजी आहे. आता एका मंत्र्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यसाठी चहावरचा खर्च कमी कऱण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल असा तर्क मंत्र्याने लढवला आहे. (Ahsan Iqbal urges pakistani to lessen tea consumption)

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

पाकिस्तानचे मंत्री अहसान इक्बाल यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी मी लोकांना आवाहन करेन की दिवसभरात दोन कप चहा कमी प्या, त्यामुळे आयात बिल कमी होईल. सध्या आपण कर्ज घेऊन चहा आयात करत आहे. तसंच वीज वाचवण्यासाठी व्यापारी साडेआठ वाजता दुकाने बंद करू शकतात असंही त्यांनी म्हटलं.

जगात जास्त चहा आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. गेल्या वर्षी ६०० मिलियन डॉलरहून जास्त किंमतीच्या चहाची खरेदी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तान सर्वाधिक चहा केनियातून मागवतो. त्यासाठी त्यांना परदेशी चलनाची गरज पडते. मात्र सध्या त्यांच्याकडी परकिय चलनाचा तुटवडा आहे. परदेशी चलन नियंत्रणात ठेवण्यासाठी पाकिस्तानने अनेक वस्तू आयात करण्यावर बंदी घातली आहे. त्यातच आता मंत्र्याने चहा कमी पिण्याचं आवाहन केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानकडे काही महिने पुरेल इतकंच परकिय चलन आहे. पाकिस्तानवर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याकडे परकिय चलन जवळपास १६ बिलियन डॉलर इतके होते ते जूनच्या पहिल्या आठवड्यात १० बिलियन डॉलरपर्यंत खाली आले आहे. पाकिस्तान सरकारकडून सातत्याने कर्जासाठी प्रयत्न केले जात असून त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.

पुढील बातम्या