मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agneepath scheme: अग्नि वीरांना निवृत्तीनंतर मिळणार निमलष्करी दलात प्राधान्य;गृहमंत्र्यांची घोषणा

Agneepath scheme: अग्नि वीरांना निवृत्तीनंतर मिळणार निमलष्करी दलात प्राधान्य;गृहमंत्र्यांची घोषणा

Jun 15, 2022, 10:19 AM IST

    • केंद्र सरकारने काल सैन्यदलात दाखल होण्यासाठी ‘अग्निवीर’ ही नवी योजना जाहिर केली. अग्निवीरांच्या ४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याववर त्यांना निमलष्करी दलांत तसेच आसाम रायफल्समध्ये प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा गुहमंत्री अमित शहा यांनी केली.
Union home minister Amit Shah (HT_PRINT)

केंद्र सरकारने काल सैन्यदलात दाखल होण्यासाठी ‘अग्निवीर’ ही नवी योजना जाहिर केली. अग्निवीरांच्या ४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याववर त्यांना निमलष्करी दलांत तसेच आसाम रायफल्समध्ये प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा गुहमंत्री अमित शहा यांनी केली.

    • केंद्र सरकारने काल सैन्यदलात दाखल होण्यासाठी ‘अग्निवीर’ ही नवी योजना जाहिर केली. अग्निवीरांच्या ४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याववर त्यांना निमलष्करी दलांत तसेच आसाम रायफल्समध्ये प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा गुहमंत्री अमित शहा यांनी केली.

Agneepath scheme केंद्र सरकारने मंगळवारी तरुणांना सैन्यदलात भरती होण्यासाठी एक महत्वपूर्ण अग्निवीर योजना जाहिर केली. या योजने नुसार १७ ते २१ वर्षातील तरुणांना भारतीय सैन्यदलांत चार वर्षांसाठी आकर्षक पगारावर भरती होता येणार आहे. दरम्यान या अग्निवीरांना निवृत्ती नंतर देशातील निमलष्करी दले आणि आसाम रायफल्समध्ये प्राधान्य दिले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुुधवारी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की सैन्यदलातील नव्या शॉर्ट टर्म रिक्रूटमेंट पॉलिसी अंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना त्यांची चार वर्षांची सेवा झाल्यावर निमलष्करी दले आणि आणि आसाम रायफलमध्ये सेवेसाठी प्राधान्य दिले जाईल. शहा म्हणाले, अग्निवीर योजना ही एक पथदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे देशातील तरुणांना चांगले भविष्य मिळेल. या संदर्भात गृहमंत्रालयाने सुद्धा एक निर्णय घेतला असून निवृत्ती नंतर या अग्निवीरांना निमष्करी दले आणि आसाम रायफल्समध्ये प्राधान्य देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत भरती झालेल्या अग्निवीर हे अॉफिसर रँकच्या खालील जवान राहणार आहेत. त्यांना चार वर्षांची नियुक्ती मिळेल. तसेच निवृत्तीनंतर ११ लाख रुपये एकरक्कमी मिळतील. यातील २५ टक्के तरुणांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. 

एका परीक्षेत पास झाल्यावर त्यांना पुन्हा पुढील लष्करी सेवेची संधी दिली जाणार आहे. अग्निवीरांना वेगळे पदनाम राहणार आहे. तसेच त्यांच्या युनिफॉर्मवरही एक वेगळ्या प्रकारचे मानचिन्ह राहणार आहे. मंगळवारी या योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनात सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी सोबत मिळून केली होती.

पुढील बातम्या