मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  E-Visa Services : कॅनडासाठी मोठा दिलासा.. दोन महिन्यानंतर भारताकडून कॅनडियन नागरिकांसाठी e-visa सेवा पुन्हा सुरू

E-Visa Services : कॅनडासाठी मोठा दिलासा.. दोन महिन्यानंतर भारताकडून कॅनडियन नागरिकांसाठी e-visa सेवा पुन्हा सुरू

Nov 22, 2023, 03:31 PM IST

  • E-Visa Services Resumed for Canadian Nstionals : दोन महिन्यांच्या खंडानंतर भारताने कॅनडियन नागरिकांसाठी निलंबित करण्यात आलेली ई-व्हिसा सेवा पुन्हा पूर्ववत केली आहे.

E-Visa Services Resumed for Canadian

E-Visa Services Resumed for Canadian Nstionals : दोन महिन्यांच्या खंडानंतर भारताने कॅनडियन नागरिकांसाठी निलंबित करण्यात आलेली ई-व्हिसा सेवा पुन्हा पूर्ववत केली आहे.

  • E-Visa Services Resumed for Canadian Nstionals : दोन महिन्यांच्या खंडानंतर भारताने कॅनडियन नागरिकांसाठी निलंबित करण्यात आलेली ई-व्हिसा सेवा पुन्हा पूर्ववत केली आहे.

भारताने जवळपास दोन महिन्यांच्या खंडानंतर कॅनडियन नागरिकांसाठी पुन्हा इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा सुरू केली आहे. भारताच्या या निर्णयामुळे कॅनडियन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. या वादातून भारताने २१ सप्टेंबरपासून कॅनडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केल्या होत्या. 

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जी-२० च्या व्हर्चुअल मीटिंगमध्ये भेटणाऱ असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दोन्ही देशांमधील व्हिसा सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधान भेटीच्या आधी भारताच्या या निर्णयाने दोन्ही देशादरम्यानचे संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे.

कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आरोप लावला होता की, जून महिन्यात कॅनडाचा नागरिक खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या एजेंटचा हात होता. भारताने या आरोपाचे खंडन करत म्हटले की, हे आरोप बुनबुडाचे आहेत. याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी भारताने केली. मात्र कॅनडाने याबाबत कोणतेही पुरावे अजूनपर्यंत भारताकडे सादर केलेले नाहीत.

ई-व्हिसा पुन्हा सुरू केल्याचा अर्थ आहे की, मेडिकल व्हिसा, बिझनेस व्हिसा आणि टूरिस्ट व्हिसा यासह चार प्रकारचे व्हिसा सामील आहेत. सप्टेंबर महिन्यात भारताने या व्हिसावर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. याबाबत दोन्ही देशांनी आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. कॅनडाने आपल्या नागरिकांना म्हटले होते की, दोन्ही देशातील संबंध बिघडल्याने नागरिकांनी भारतात प्रवास करताना सावधताना बाळगावी.

 

विभाग

पुढील बातम्या