मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड... रायबरेलीतून राहुल लढणार की प्रियांका?

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड... रायबरेलीतून राहुल लढणार की प्रियांका?

Feb 15, 2024, 11:24 PM IST

  • Rahul or Priyanak in Raebareli : सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी अर्ज सादर केल्यानंतर आता त्यांच्या रायबरेली मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. या यादीत सर्वात अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे प्रियंका गांधी.

Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra and party leader Rahul Gandhi (Ayush Sharma)

Rahul or Priyanak in Raebareli : सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी अर्ज सादर केल्यानंतर आता त्यांच्या रायबरेली मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. या यादीत सर्वात अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे प्रियंका गांधी.

  • Rahul or Priyanak in Raebareli : सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी अर्ज सादर केल्यानंतर आता त्यांच्या रायबरेली मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. या यादीत सर्वात अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे प्रियंका गांधी.

तब्बल २५ वर्ष लोकसभा सदस्य म्हणून कार्य केल्यानंतर कॉंग्रेस संसदीय दलाच्या नेत्या आणि माजी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. सोनियांनी राजस्थानमधून नुकताच उमेदवारी अर्ज सादर केला आहे. वय आणि तब्येतीच्या कारणावरून आपण संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाने हा निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

WhatsApp : व्हॉट्सॲपने अँड्रॉईड युजर्सना दिले भन्नाट गिफ्ट, स्टिकर्स बनवण्याची मजा झाली द्विगुणित

Fact Check: राहुल गांधी फेसबूक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना दरवर्षी एक लाख रुपये देणार? वाचा

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

खासकरून गांधी कुटुंबाचे सदस्य मुख्यतः उत्तर प्रदेशमधून संसद सदस्य म्हणून निवडून गेलेले आहेत. जवाहरलाल नेहरू, फिरोज गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधींपासून राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील विविध लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. खुद्द सोनिया गांधी या २००४ सालापासून गेली तब्बल २० वर्ष रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. तत्पुर्वी १९९९ साली सोनिया सर्वप्रथम कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठी या दोन्ही मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. सोनियांनी त्यावेळी बेल्लारी लोकसभा सीटचा राजीनामा देऊन अमेठीची सीट कायम ठेवली होती. दरम्यान, राजस्थानमधून राज्यसभेचा अर्ज सादर करताना सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानले आणि माझ्या कुटुंबीयांसोबत राहा, अशी मतदारांना विनंती केली होती. सोनियांनी कुटुंबीयांचा उल्लेख केल्यामुळे आता यापुढे रायबरेली मतदारसंघातून कॉंग्रेसमधून कोण निवडणूक लढवणार, याची या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, २०१९ साली राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव झाला होता. राहुल सध्या केरळच्या वायनाडचं लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.

प्रियांका गांधी रायबरेलीतून लढणार?

कॉंग्रेसतर्फे सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांनाच रायबरेतीलून लोकसभा लढण्यासाठी सांगण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रियंका यांची आजी, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा लोकसभेत रायबरेली मतदारसंचं प्रतिनिधित्व केलं होतं. विशेष म्हणजे इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यक्तिमत्वात उल्लेखनीय साम्य लक्षात घेता ही निवड अधिक तर्कसंगत होईल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. प्रियंका गांधींच्या लोकसभा कारकिर्दीच्या सुरूवात करण्यासाठी रायबरेली हा सुरक्षित मतदारसंघ मानला जात असला तरी अमेठीतून स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींचा झालेला पराभव कॉंग्रेस पक्ष अद्याप विसरलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रियंकासाठी रायबरेली सीट वाटते तेवढी सोपी नसणार आहे.

प्रियंका गांधी या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे रायबरेलीहून न लढता प्रियंका या वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एकूणच सोनिया गांधी यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारल्यामुळे उत्तर प्रदेश कॉंग्रेसमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अगदी फार कमी दिवस उरले असून लवकरच यात स्पष्टता येईल.

पुढील बातम्या