मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Qatar court news : भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त जवानांना कतारमध्ये फाशीची शिक्षा, भारत ‘अ‍ॅक्शन मोड'मध्ये

Qatar court news : भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त जवानांना कतारमध्ये फाशीची शिक्षा, भारत ‘अ‍ॅक्शन मोड'मध्ये

Oct 26, 2023, 06:10 PM IST

  • Qatar court on Ex Indian Navy Officer : कतारच्या न्यायालयानं भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानं खळबळ उडाली आहे.

Qatar court verdict

Qatar court on Ex Indian Navy Officer : कतारच्या न्यायालयानं भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Qatar court on Ex Indian Navy Officer : कतारच्या न्यायालयानं भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानं खळबळ उडाली आहे.

Qatar Court verdict News in Marathi : मागच्या वर्षभरापासून कतारच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त जवानांना तिथल्या न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित भारतीय जवानांवर हेरगिरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. कतार न्यायालयाच्या या निर्णयाची भारत सरकारनं गंभीर दखल घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

भारतीय नौदलात एकेकाळी प्रमुख युद्धनौकांचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. हे सर्व जण डेहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी काम करत होते. ही एक खासगी कंपनी असून कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या सेवा पुरवण्याचं काम करते.

वर्षभरापूर्वी अटक झाल्यानंतर या अधिकाऱ्यांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो वारंवार फेटाळण्यात आला. त्यानंतर वेळोवेळी या अधिकाऱ्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. आता त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत सरकारनं फाशीच्या शिक्षेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या अधिकाऱ्यांची सुटका व्हावी म्हणून भारत सरकार कायदेशीर चाचपणी सुरू केली आहे. न्यायालयाच्या सविस्तर निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. निर्णयाची वाट पाहत आहोत. कतार सरकारकडं हा मुद्दा मांडला जाईल, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

'या प्रकरणी पुढील कायदेशीर लढाईसाठी भारत सज्ज आहे. हे प्रकरण सरकारच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन दिलं जाईल, असंही केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

दोन्ही देशांच्या सरकारचं मौन

मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठही अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप आहे. वर्षभराहून अधिक काळ कतारच्या तुरुंगात असलेल्या या अधिकाऱ्यांविषयी कतार किंवा भारत सरकारच्या अधिकार्‍यांनी आतापर्यंत कधीच सविस्तर माहिती दिलेली नाही. या प्रकरणाचं वार्तांकन करणारा एक भारतीय पत्रकार आणि त्याच्या पत्नीला कतार सरकारनं नुकतेच देश सोडण्याचे आदेश दिले होते.

विभाग

पुढील बातम्या