मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fire In China : चीनच्या हेनान प्रांतात भीषण आग; तब्बल ३६ जणांचा होरपळून मृत्यू!

Fire In China : चीनच्या हेनान प्रांतात भीषण आग; तब्बल ३६ जणांचा होरपळून मृत्यू!

Nov 22, 2022, 07:44 AM IST

    • Fire Incident In China : चीनच्या हेनान प्रांतातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Fire In China Today Live (HT)

Fire Incident In China : चीनच्या हेनान प्रांतातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Fire Incident In China : चीनच्या हेनान प्रांतातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Fire In China Today Live : चीनच्या हेनान प्रांतातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल ३६ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं जगभरात खळबळ उडाली आहे. हेनानमधील एनयांग शहरात ही दुर्दैवी घटना घडली असून त्यानंतर अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं. याशिवाय वेळीच कार्यवाही केल्यानं शेकडो लोकांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या भीषण आगीच्या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी चार वाजेच्या सुमारास चीनच्या हेनान प्रांतातील एनयांग शहरातील एका कारखान्यात भीषण आग लागली. याबाबतची माहिती चिनी माध्यमांनी आज दिली आहे. तेव्हा कारखान्यात शेकडो मजूर काम करत होते. आग लागल्याचं समजताच कामगारांमध्ये धावपळ उडाली. परंतु आग वाढत गेल्यानं त्यात तब्बल ३६ कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या ६० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं. याशिवाय आग विझवण्यासाठी कारखान्यातील २०० हून अधिक कामगार आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाच्या आकांतानं मेहनत घेतली. या भीषण आगीमुळं हेनानमधील या कारखान्यातील कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. याशिवाय कंपनीतील महत्त्वपूर्ण उपकरणं, वाहनं आणि इतर साहित्य जळून खाक झाली आहेत.

विभाग

पुढील बातम्या