मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Video : हवाई दलाच्या ट्रेनी विमानाला तेलंगणमध्ये अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

Video : हवाई दलाच्या ट्रेनी विमानाला तेलंगणमध्ये अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

Dec 04, 2023, 02:38 PM IST

  • IAF Aircraft crash news in marathi : भारतीय हवाई दलाचं एक प्रशिक्षणार्थी विमान हैदराबादजवळ कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

Aircraft crashes

IAF Aircraft crash news in marathi : भारतीय हवाई दलाचं एक प्रशिक्षणार्थी विमान हैदराबादजवळ कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

  • IAF Aircraft crash news in marathi : भारतीय हवाई दलाचं एक प्रशिक्षणार्थी विमान हैदराबादजवळ कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

Telangana Pilatus trainer aircraft crash : तेलंगणातील डुंडीगल इथं भारतीय हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची भयानक दृश्यही समोर आली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

भारतीय हवाई दलानं या अपघाताच्या बातमीस दुजोरा दिला आहे. प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडली. हवाई दलानं या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. हा अपघात नेमका कशामुळं झाला, याचा शोध घेतला जात आहे. अपघातग्रस्त विमान स्वित्झर्लंडमधील पिलाटस एअरक्राफ्ट या कंपनीनं बनवलेलं होतं.

Cyclone Michaung: मिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर; चेन्नई विमानतळाच्या रनवेवर साचले पाणी, अनेक उड्डाणे रद्द

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. हैदराबादजवळ झालेल्या या अपघाताची बातमी ऐकून तीव्र दु:ख झालं. दोन वैमानिकांना जीव गमवावा लागला हे अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

हवाई दलाकडून निवेदन

भारतीय हवाई दलाच्या हवाल्यानं एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षणाचा भाग म्हणून आज सकाळी नेहमीप्रमाणे हैदराबादहून उड्डाण केलेलं Pilatus PC 7 Mk II हे विमान आज सकाळी कोसळलं. या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी झाले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. हे विमान निर्जन परिसरात कोसळल्यामुळं अपघातात कुणी नागरिक जखमी झाला नाही.

यापूर्वी १ जून रोजी कर्नाटकातील चामराजनगर भागात हवाई दलाच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट थोडक्यात बचावले होते.

 

पुढील बातम्या