मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MP's Suspended : तब्बल १५ ‘गोंधळी’ खासदारांचं संसदेतून निलंबन; संपूर्ण अधिवेशनादरम्यान राहणार बाहेर

MP's Suspended : तब्बल १५ ‘गोंधळी’ खासदारांचं संसदेतून निलंबन; संपूर्ण अधिवेशनादरम्यान राहणार बाहेर

Dec 14, 2023, 07:12 PM IST

    • संसदेतील घुसखोरीबद्दल चर्चा करताना लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या १५ खासदारांना आज संसदेतून निलंबित करण्यात आले.
Opposition MPs create a ruckus in the Lok Sabha during the Winter Session of Parliament, in New Delhi (ANI)

संसदेतील घुसखोरीबद्दल चर्चा करताना लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या १५ खासदारांना आज संसदेतून निलंबित करण्यात आले.

    • संसदेतील घुसखोरीबद्दल चर्चा करताना लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या १५ खासदारांना आज संसदेतून निलंबित करण्यात आले.

लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकूण १५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यात कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक ९, द्रविड मुन्नेत्र कडघमचे दोन, सीपीएमचा एक आणि तृणमूल खासदाराचा समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्या कॉंग्रेस (Congress) खासदारांमध्ये माणिकम टागोर, व्हि. के श्रीकंदन, मोहम्मद जावेद, बेन्नी बेहनन , डीन कुरियाकोज, हिबी इडेन, टी एन प्रतापन, रमय्या हरिदास आणि जे सेन्नीमलाई यांचा समावेश आहे. DMK खासदारांमध्ये के. कनिमोळी आणि एस आर प्रतिभान यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे CPI(M) दोन खासदार निलंबित करण्यात आले असून त्यात खासदार पीआर नटराजन आणि एस व्हेंकटेसन यांचा समावेश आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार के सुब्बरय्यम यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) डेरेक ब्रओन यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

काल, बुधवारी, नवी दिल्लीत संसद परिसरातील कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून काही तरुणांनी लोकसभेत घुसून उड्या मारल्या होत्या. ही सुरक्षेमध्ये झालेली फार मोठी चूक होती. या घटनेबद्दल विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज राज्यसभा आणि लोकसभेत प्रश्न विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर दोन्ही सभागृहात निवेदन करण्याची विनंती विरोधी पक्षाचे खासदार करत होते.

अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनावर निलंबित खासदारांपैकी असलेल्या DMK च्या खासदार कनिमोझी यांनी सरकारवर टीका केली. कर्नाटकचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासचा उपयोग करून घुसखोर तरुण संसदेत घुसले होते. आता सरकार सिम्हा यांना वाचवत असल्याचा आरोप कनिमोझी यांनी केला. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांना ‘चौकशी पूर्ण न होता’ संसदबाहे काढले, असा आरोप त्यांनी केली. ‘संसदेत उड्या मारणाऱ्या लोकांना आत येण्यासाठी ज्या खासदाराने पास दिले आहेत त्या खासदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु महुआ मोईत्राच्या बाबतीत काय झाले ते आपण पाहिले आहे. चौकशी पूर्ण न होताच त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र प्रताप सिम्हा या खासदाराचे निलंबनही झालेले नाही. ते आमच्यासोबत संसदेत आहे’ असं कनिमोझी यांनी एएनआयला सांगितले.

यावेळी विरोधी खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘तानाशाही नही चलेगी…’ अशा घोषणा दिल्या.

पुढील बातम्या