मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  १० वर्षीय मुलीचे कबरीतून अचानक गायब झाले शीर, आठवडाभरापूर्वीच केले होते दफन; जादू-टोण्याचा संशय

१० वर्षीय मुलीचे कबरीतून अचानक गायब झाले शीर, आठवडाभरापूर्वीच केले होते दफन; जादू-टोण्याचा संशय

Oct 27, 2022, 06:52 PM IST

    • आठवडाभरापूर्वी दफन केलेल्या १० वर्षीय मुलीचे शीर कबरीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तामिळनाडूतील चेंगलपट्ट जिल्ह्यातील आहे.
१० वर्षीय मुलीचे कबरीतून अचानक गायब झाले शीर

आठवडाभरापूर्वी दफन केलेल्या १० वर्षीय मुलीचे शीर कबरीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तामिळनाडूतील चेंगलपट्ट जिल्ह्यातील आहे.

    • आठवडाभरापूर्वी दफन केलेल्या १० वर्षीय मुलीचे शीर कबरीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तामिळनाडूतील चेंगलपट्ट जिल्ह्यातील आहे.

तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील मधुरंथकमजवळील चित्रवाडी गावात आठवडाभरापूर्वी दफन करण्यात आलेल्या १० वर्षीय मुलीचे शीर कबरीतून अचानक गायब झाले आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पोलीस जादूटोण्याच्या दिशेनेही तपास करत आहेत. मृत मुलगी ५ ऑक्टोबर रोजी गंभीर जखमी झाली होती. घराबाहेर खेळत असताना विजेचा खांब अंगावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कृतिका असे मृत मुलीचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

जवळपास नऊ दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १४ ऑक्टोबरला कृतिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दहा दिवसांनंतर तिचे आईवडिल पांडियन आणि नादिया यांच्या लक्षात आले की, तिची कबरी पुन्हा खोदली गेली आहे. याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जिल्हा वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि जिल्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कबर उघडली असता तेथून मुलीचे डोके गायब असल्याचे आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली.

चित्तूर पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहेत. पूर्ववैमनस्यातून मुलीचे शीर कोणीतरी कबरीतून नेले की कोणी जादूटोणा करून केले, याचा तपास सुरू आहे. मुलीचे दफन केलेल्या ठिकाणाजवळ पोलिसांना काही वापरलेले हातमोजे आणि अन्य काही वस्तूही सापडल्या आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

पुढील बातम्या