मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : “मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे”; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

Maratha Reservation : “मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे”; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

Sep 06, 2023, 11:05 PM IST

  • Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे घडली आहे.

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे घडली आहे.

  • Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे घडली आहे.

धाराशिव -  जालन्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू केले असून यामुळे राज्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात समिती स्थापन केली असून निजामकालीन नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे घडली आहे. तरुणाने आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणा देत गाव तलावात उडी मारून आपले जीवन संपवले. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

किसन चंद्रकांत माने (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर गावात महसूल, पोलीस प्रशासन दाखल झाले असून ग्रामस्थांच्या जमावाने मराठा आरक्षणासाठी जोरदार नारेबाजी केली.

माडज येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, किसन माने मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत होता. बुधवारी दुपारच्या सुमारासही तो याच विषयावर बोलत होता. एका दुकानासमोर बसून आरक्षणावर चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासन गावात दाखल झाले. त्यांच्यासमोरच गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जोरदार घोषणाबाजी केली. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या