मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Khuni River Flood : अर्धा महाराष्ट्र कोरडा असताना यवतमाळमध्ये पूर, खुनी नदीत अडकला गावकरी

Khuni River Flood : अर्धा महाराष्ट्र कोरडा असताना यवतमाळमध्ये पूर, खुनी नदीत अडकला गावकरी

Sep 05, 2023, 04:50 PM IST

    • Khuni River Flood : पाय घसरून तोल गेल्याने तरुण खुनी नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता बचाव पथकाकडून मोठी कामगिरी पार पाडण्यात आली आहे.
Yavatmal Khuni Flood News (HT)

Khuni River Flood : पाय घसरून तोल गेल्याने तरुण खुनी नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता बचाव पथकाकडून मोठी कामगिरी पार पाडण्यात आली आहे.

    • Khuni River Flood : पाय घसरून तोल गेल्याने तरुण खुनी नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता बचाव पथकाकडून मोठी कामगिरी पार पाडण्यात आली आहे.

Yavatmal Khuni Flood News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आता विदर्भातून धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खुनी नदीला पूर आला असून त्यात एक तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून बचाव पथकाच्या प्रसंगावधानतेमुळं संबंधित तरुणाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. दशरथ गौत्रे असं नदीत बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. बचावकार्यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील खुनी नदीला पूर आला आहे. अचानक आलेल्या पुरात पांढरकवडा येथे दशरथ गौत्रे हा तरुण अडकल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच दशरथ गौत्रेला पुरातून बाहेर काढण्यात आलं. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अपुऱ्या प्रकाशात बचाव पथकाने तरुणाला जीवदान दिलं आहे. त्यामुळं नागरिकांनी बचाव पथकाचं कौतुक केलं आहे.

मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. खुनी नदीला आलेल्या पुरामुळं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच पुरामध्ये अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात आल्याने लोकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

पुढील बातम्या