मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal: यवतमाळमध्ये २४० मिमी पाऊस; २१९ जणांचे सुरक्षित स्थलांतर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Yavatmal: यवतमाळमध्ये २४० मिमी पाऊस; २१९ जणांचे सुरक्षित स्थलांतर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jul 23, 2023, 12:00 AM IST

  • Mahagaon helicopter rescue operation: यवतमाळमध्ये शनिवारी २४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Amol Yedge, Collector, Yavatmal

Mahagaon helicopter rescue operation: यवतमाळमध्ये शनिवारी २४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

  • Mahagaon helicopter rescue operation: यवतमाळमध्ये शनिवारी २४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Yavatmal Rains Updates: यवतमाळमध्ये बुधवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. घरे आणि रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, एसडीआरएफ आणि आयएएफ हेलिकॉप्टरच्या मदतीने विविध भागात अडकलेल्या २१९ नागरिकांची सुरक्षित स्थलांतर करण्यात आल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

अमोल येडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी २४० मिमी पावसांची नोंद करण्यात आली. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. एसडीआरएफ आणि आयएएफ हेलिकॉप्टरच्या मदतीने विविध भागात अडकलेल्या २१९ नागरिकांना लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.”

यवतमाळमध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी पावसाने रौद्ररुप धारण केले. उमरखेड तालुक्यात ६९.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय, महागाव (४९.३ मिमी), आर्णी (५७.४ मिमी), दिग्रस (११.८ मिमी), पुसद (९.६ मिमी), नेर (३.९ मिमी), वणी (२० मिमी), मारेगाव (१४.५ मिमी), झरी (१०.९ मिमी), केळापुर (१५.२ मिमी), घांटजी (१५.५ मिमी), राळेगाव (६८ मिमी), दारव्हा (८८ मिमी), बाभुळगाव (८ मिमी), कंळब (४.२ मिमी) आणि यवतमाळ तालुक्यात सरासरी ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या