मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal News : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्यादोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

Yavatmal News : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्यादोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

Nov 19, 2023, 09:50 PM IST

  • Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील मनदेव गावा येथील जेतवन पर्यटनस्थळी दोन चिमुकल्या मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

मृत मुली

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील मनदेव गावा येथील जेतवन पर्यटनस्थळी दोन चिमुकल्या मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

  • Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील मनदेव गावा येथील जेतवन पर्यटनस्थळी दोन चिमुकल्या मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मनदेव गावा येथील जेतवन पर्यटनस्थळी दोन चिमुकल्या मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या मुली दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मामाच्या गावाला आल्या होत्या. रिया किशोर बिहाडे आणि काव्या धम्मपाल भगत अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. यातील काव्या भगत ही मामाच्या गावी आली होती. याचवेळी ही घटना घडली आहे. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या मनदेव गावा येथील जेतवनमध्ये दुपारच्या सुमारासही घटना घडली. खेळत असताना तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सुटीत मामाच्या गावी आलेली काव्या भगत आपल्या कुटूंबासह जेतवनला भेट देण्यासाठी गेली होती.

जेतवन परिसरात खेळत असताना या मुली अचानक तलावात पडल्या. दोघी पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तलावाकडे धाव घेतली. त्यांना तलावाच्या बाहेर काढण्यात आलं. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दोघींनाही मृत घोषित केलं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या