मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dengue: यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; एकाच दिवशी आणखी तिघांचा मृत्यू

Dengue: यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; एकाच दिवशी आणखी तिघांचा मृत्यू

Oct 09, 2023, 01:23 PM IST

  • dengue Disease : यवतमाळ जिल्ह्यातील नेर व आर्णी येथे एकाच दिवशी तीन लहान मुलांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे.

dengue Disease

dengue Disease : यवतमाळ जिल्ह्यातील नेर व आर्णी येथे एकाच दिवशी तीन लहान मुलांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे.

  • dengue Disease : यवतमाळ जिल्ह्यातील नेर व आर्णी येथे एकाच दिवशी तीन लहान मुलांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे.

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातडेंग्यूच्या संक्रमनाने थैमान घातले असून अनेक नागरिक आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून या आजाराने अनेकांचा जीव देखील गेला आहे. याच दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील नेर-आर्णी मध्ये डेंग्यूच्या आजाराने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी तीन जणांचा बळी गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

साहिल खांडेकर, कर्तव्य झांबरे (दोघेही रा. नेर) तर जागृती चव्हाण (रा. मालेगाव, आर्णी तालुका)  अशी डेंग्यूने मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची नावे आहेत. यवतमाळमध्ये डेंग्यू आजाराने एकाच दिवशी नेर आणि आर्णी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरु आहे. अजूनही हे संक्रमण आटोक्यात आलेले नाही. यवतमाळ, महागाव, मारेगाव या तालुक्यात आतापर्यंत डेंग्यूने अनेक लहान मुलांचा बळी घेतला आहे. यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नाही. आता आणखी तीन मुलांचा बळी गेला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या