मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  यवतमाळच्या सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह; मठाधिपती व सेवेकऱ्याच्या गूढ मृत्यूने परिसरात खळबळ

यवतमाळच्या सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह; मठाधिपती व सेवेकऱ्याच्या गूढ मृत्यूने परिसरात खळबळ

Aug 29, 2023, 07:22 PM IST

  • yavatmal crime : यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठात  मठप्रमुख व त्यांच्या सेवेकरी यांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Sajjangarh Math

yavatmal crime : यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठात मठप्रमुखव त्यांच्या सेवेकरी यांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

  • yavatmal crime : यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठात  मठप्रमुख व त्यांच्या सेवेकरी यांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सज्जनगड मठात दोन मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.  यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठात मठप्रमुख व त्यांच्या सेवेकरी यांचे मृतदेह आढळले आहेत. लक्ष्मण शेंडे उर्फ चरणदास महाराज व पुष्पा होले अशी मृतांचे नाव आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले आहे.  घरातील साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत आढळले होते. दोघांच्या शरीरावर कोणत्याही मारहाणीच्या खुणा आढळल्या  नाहीत. त्याचबरोबर मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने पोलीसही चक्रावले आहेत. 

चरणदास महाराज व पुष्पा होले गेल्या अनेक वर्षांपासून मठात वास्तव्यास होते. चरणदास महाराज जडीबुटी देऊन असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी उपचार केल्यामुळे अनेक लोक आजारातून बरे झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्यांना मानणारे अनेक अनुयायी होते. त्यांच्या अचानक मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे.

चरणदास महाराज यांच्याकडे असणाऱे पैसे व सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्याच्या उद्देश्याने ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून श्वान पथक, ठसेतज्ज्ञ आदींना पाचारण करुन तपास केला जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या