मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : '..म्हणून सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या' मंगेश साबळे यांनी कारण सांगितलं

VIDEO : '..म्हणून सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या' मंगेश साबळे यांनी कारण सांगितलं

Oct 26, 2023, 09:25 PM IST

  • Gunaratna  Sadavarte : मराठा आंदोलनकर्ते मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं कारणही सांगितलं आहे.

gunaratna sadavartes car vandalised

Gunaratna Sadavarte : मराठा आंदोलनकर्ते मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं कारणही सांगितलं आहे.

  • Gunaratna  Sadavarte : मराठा आंदोलनकर्ते मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं कारणही सांगितलं आहे.

Maratha Reservation : मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्यासह काही तरुणांनी गुरुवारी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनीगुन्हा दाखल करत मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक केली. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं कारणही सांगितलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ॲड. गुणरत्न सदावर्तें (AD. Gunratne Sadavarte) यांच्या गाडीची मुंबईत तोडफोड केली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या आरोपींना ताब्यात घेतलं. न्यायालयानं पाच हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका केली. सदावर्ते मराठा आंदोलनाचा वारंवार अपमान करत असल्यामुळे तसेच मराठ्यांना  माजोरडा म्हणत असल्यानं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचं मंगेश साबळे यांनी म्हटलं आहे.

साबळे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण मराठा समाजा माजोरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही,मराठा समाजाची सभा ही जत्रा आहे असं, सातत्याने बोलून आमच्या भावना दुखावण्याचं काम गुणरत्न सदावर्तेकरत आहेत. यालाचाप लावण्याचं काम आम्ही केलंय. आमच्याकडून कायदा मोडला गेला असेल तरी लाखो करोडो मराठ्यांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. लाखो-करोडो मराठांच्या मानसन्मानाचा हा प्रश्न आहे असं मंगेश साबळे यांनी म्हटलंय.

छत्रपतींच्या मराठ्यांना माजोरडा म्हणणं हे सदावर्तेंना महागात पडेल हे दाखवून देण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या