मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad dahi handi: दहीहंडीत धक्का लागल्यानं मांडीत खुपसला चाकू; दोन गटात तुफान हाणामारी

Aurangabad dahi handi: दहीहंडीत धक्का लागल्यानं मांडीत खुपसला चाकू; दोन गटात तुफान हाणामारी

Aug 20, 2022, 10:00 AM IST

    • Aurangabad Connaught Place dahi handi: दहीहंडी साजरी करत असताना एका तरुणाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे.
Dahi Handi In Connaught Place Aurangabad (Sandip Mahankal)

Aurangabad Connaught Place dahi handi: दहीहंडी साजरी करत असताना एका तरुणाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे.

    • Aurangabad Connaught Place dahi handi: दहीहंडी साजरी करत असताना एका तरुणाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे.

Dahi Handi In Connaught Place Aurangabad : गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं राज्यात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. परंतु यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नियममुक्त आणि निर्बंधमुक्त दहीहंडी राज्यभरात साजरी करण्यात आली. परंतु आता आनंदानं साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडीला औरंगाबाद शहरात गालबोट लागलं आहे. कारण शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात दहीहंडी साजरी केली जात असताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादावरून एका तरुणाच्या मांडीत चाकू खुपसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरात दहीहंडी साजरी केली जात होती, त्यावेळी धक्का लागल्यानं दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गटांत क्षुल्लक कारणावरून आधी वाद झाला, त्यानंतर रागावलेल्या एका तरुणानं दुसऱ्या तरुणाच्या मांडीवर चाकूहल्ला केला, त्यामुळं या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर दहीहंडी उत्सवात तरुणावर चाकूहल्ला करून हौदोस घालणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

डिजेच्या तालावर तरुणाई बेधुंद...

शहरातील कोकणवाडी चौक, औरंगपुरा, सिडको, कनॉट, निराला बाजार, पुंडलिकनगर, बजरंग चौक आणि गुलमंडी या भागांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डिजेच्या तालावर तरुणाई थिरकल्याचं दृष्य पाहायला मिळालं.

पुण्यातही दहीहंडी उत्सवाला गालबोट...

पुण्यातील सिंहगड परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान मोक्का लागलेल्या आरोपीनं गोळीबार केल्यानं शहरातील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. याशिवाय आता औरंगाबादेतही दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या तरुणांच्या दोन गटात वाद होऊन चाकूहल्ला झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या