मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitaran : काय आहे महावितरणची ‘Go-Green’ योजना? होत आहे वीजग्राहकांची लाखोंची वार्षिक बचत

Mahavitaran : काय आहे महावितरणची ‘Go-Green’ योजना? होत आहे वीजग्राहकांची लाखोंची वार्षिक बचत

Feb 14, 2023, 12:21 AM IST

  • Mahavitarans Go-Green scheme : महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल'  व 'एसएमएस' चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.

 ‘गो-ग्रीन’ योजना

Mahavitarans Go-Green scheme : महावितरणच्या'गो-ग्रीन'योजनेनुसार वीजग्राहकांनी छापीलवीजबिलाच्याकागदाऐवजीफक्त'ई-मेल' व'एसएमएस' चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात१०रुपये सवलतदेण्यात येत आहे.

  • Mahavitarans Go-Green scheme : महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल'  व 'एसएमएस' चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या जळगाव परिमंडलातील पर्यावरणस्नेही १६  हजार ६६० ग्राहकांकडून १९ लाख ९९ हजार २०० रुपयांची वार्षिक बचत होत आहे. तर औरंगाबाद परिमंडलातील  १७  हजार ३६४  ग्राहकांकडून  २० लाख  ८३ हजार  ६८०  रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

काय आहे गो ग्रीन योजना -

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस'द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्‍ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता ‍कैलास हुमणे यांनी केले आहे.

जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव मंडलात १०  हजार ६७७  ग्राहक  'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत.  धुळे मंडलात 'गो-ग्रीन' मध्ये ३ हजार ८५३ ग्राहक सहभागी आहेत. तसेच नंदुरबार मंडलातील २ हजार १३० ग्राहकांनी 'गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे.

औरंगाबाद परिमंडलांतर्गत औरंगाबाद शहर मंडलात ८  हजार ९३८ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. औरंगाबाद ग्रामीण मंडलात 'गो-ग्रीन' मध्ये ५ हजार ४२४  ग्राहक सहभागी आहेत. तसेच जालना मंडलातील ३ हजार २ ग्राहकांनी 'गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे.

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या