मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  how to use cooler : कुलर वापरताना करंट लागू नये म्हणून ‘ही’ काळजी घ्याल

how to use cooler : कुलर वापरताना करंट लागू नये म्हणून ‘ही’ काळजी घ्याल

Apr 24, 2023, 11:27 AM IST

    • how to use cooler : सध्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कूलरला प्राधान्य दिले जाते. मात्र, हा कूलर लवतांना काळजी घेणे गरजेचे असते. खबरदारी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने काळजी घेण्याचे आवाहन केले.
how to use cooler

how to use cooler : सध्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कूलरला प्राधान्य दिले जाते. मात्र, हा कूलर लवतांना काळजी घेणे गरजेचे असते. खबरदारी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने काळजी घेण्याचे आवाहन केले.

    • how to use cooler : सध्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कूलरला प्राधान्य दिले जाते. मात्र, हा कूलर लवतांना काळजी घेणे गरजेचे असते. खबरदारी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने काळजी घेण्याचे आवाहन केले.

पुणे : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक कूलर लावण्यास प्राधान्य देत आहे. पण हा कूलर जर काळजीपूर्वक हाताळला नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. कूलरचा शॉक लागून अनेकांनी प्राण गमवल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कूलर हाताळतांना काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच काय करावे या बाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

parshuram ghat : परशुराम घाट पुढील पंधरा दिवस वाहतुकीसाठी बंद ! १००हून अधिक ST फेऱ्या रद्द

कुलरवापरताना विद्युत सुरक्षेची घ्यावी खबरदारी

कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा.कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वीकुलरचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा म्हणजेकुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्विच चालू करावे. त्यानंतरकुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये.कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही.कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी.

MP News : धक्कादायक ! प्रेग्नंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पाच मुलींचे थांबवले लग्न; मुख्यमंत्री विवाह योजना वादात

पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरचकुलरला हात लावावा. ओल्या हातांनीकुलरला कधीही स्पर्श करू नये. लहान मुलांना नेहमीकुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि तीकुलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठीकुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरूनकुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही.

कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे.कुलरबाबत माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये.कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे.कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे.कुलरहलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी.

कुलरपंप अधूनमधून बंद करावा. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. आपल्या दैनंदिन व्यापातून थोडासा वेळ या उपाययोजनांसाठी दिला तरकुलरमुळे होणारे विद्युत अपघात टळू शकतात.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या