मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ganpatipule whale news : गणपतीपुळे बीचवर वाहून आला तब्बल ५ हजार किलो वजनाचा देवमासा; समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरू

ganpatipule whale news : गणपतीपुळे बीचवर वाहून आला तब्बल ५ हजार किलो वजनाचा देवमासा; समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरू

Nov 14, 2023, 04:03 PM IST

  • whale fish on ganpatipule beach: रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचे एक पिल्लू आले असून गेल्या ३० तासांपासून या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्या जात आहेत. 

whale fish on ganpatipule beach:

whale fish on ganpatipule beach: रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचे एक पिल्लू आले असून गेल्या ३० तासांपासून या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्या जात आहेत.

  • whale fish on ganpatipule beach: रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचे एक पिल्लू आले असून गेल्या ३० तासांपासून या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्या जात आहेत. 

whale fish on ganpatipule beach: रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर एक व्हेल माशाचे पिल्लू आले असून गेल्या ३० तासांपासून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल २० फुट लांब आणि ५ टन वजनाचा हा मासा असून पर्यटक, स्थानिक नागरिक, एक्सपर्ट, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. समुद्रात ओहोटी असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती रेस्क्यू पथकाने दिली. या मशावर प्रथमोपचार करण्यात आले असून एका मोठ्या जहाजाच्या मदतीने त्याला समुद्रात सोडण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे सोमवारी सकाळी एक अल्पवयीन ब्लू व्हेल माझा किनाऱ्यावर वाहून आला. या माशाला समुद्रात पाठवण्यासाठी वन अधिकारी ३० तासांपासून प्रयत्न करत आहेत. रेंज फॉरेस्ट ऑफिसर राजेश्री कीर म्हणाल्या, ''हा मासा लहान असून सोमवारी किनाऱ्यावर आला. तेव्हापासून आम्ही या बेबी व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. भरतीच्या वेळी समुद्रात पाठवण्याचे दोनदा प्रयत्न केले, पण हा मासा पुन्हा किनाऱ्यावर आला आहे. दोन क्रेनच्या साह्याने या पाच टन वजनाच्या व्हेलला हलवणे कठीण झाले होते. हा मासा २०  फुट लांब आहे. या व्हेल माशावर उपचार करण्यात आले आहे. या माशाला आज रात्री पुन्हा समुद्रात सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्या, व्हेलला वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची बोट आली, पण अपयशी ठरले. आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही जिंदाल स्टील वर्क्सच्या टगला विनंती केली आहे आणि पोलिस आम्हाला ट्रॉलर्स देत आहेत. ब्लू व्हेलचे हे बाळ जगावे अशी आमची इच्छा आहे, परंतु ते दीर्घकाळ पाण्याबाहेर असल्याने अशक्त झाले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या