मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Western Railway : पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला तब्बल १६ कोटींचा दंड

Western Railway : पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला तब्बल १६ कोटींचा दंड

May 12, 2023, 11:19 PM IST

  • Western railway  : पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२३ मध्ये अशातच फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहेत.

Western Railway

Western railway : पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२३ मध्ये अशातच फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहेत.

  • Western railway  : पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२३ मध्ये अशातच फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहेत.

Western Railway : मुंबईतील तिन्ही लोकल मार्गावर दररोज शेकडो उपनगरीय गाड्या धावत असतात तसेच या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहेत. यातच रेल्वेतून फुटक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. आता रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

पश्चिम रेल्वे विभागाकडून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध वारंवार कारवाई करण्यात येते. पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२३ मध्ये अशातच फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहेत.

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ८३,५२२ प्रकरणे शोधून ४.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी नियमित कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतएप्रिल २०२३ मध्ये ६३०० हून अधिक विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २१.३४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे,जे मागील वर्षाच्या तुलनेत २३८.१९ टक्क्यांनी अधिक आहे.

दरम्यान,गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वे विभागाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७. ७० लाख फुकट्या प्रवाशांत कारवाई करत तब्बल १५८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

याशिवाय केवळ दोन तिकीट तपासणीसांच्या विनातिकीट प्रवासी तपासणीतून २ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या