मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजानसाठी भोंगे लावत नाही, पण साईंची आरती स्पीकरवर होऊ द्या: जामा मशिद ट्रस्ट

अजानसाठी भोंगे लावत नाही, पण साईंची आरती स्पीकरवर होऊ द्या: जामा मशिद ट्रस्ट

May 05, 2022, 09:46 AM IST

    • जामा मशिदीच्या विश्वस्तांनी शिर्डीत साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नयेत अशी विनंती केली आहे.
साईबाबा मंदिर, शिर्डी (फोटो - एएनआय)

जामा मशिदीच्या विश्वस्तांनी शिर्डीत साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नयेत अशी विनंती केली आहे.

    • जामा मशिदीच्या विश्वस्तांनी शिर्डीत साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नयेत अशी विनंती केली आहे.

मशिदीवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता. मशिदीवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर आम्ही त्यासमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर ४ मे रोजी मनसेने अनेक ठिकाणी मशिदींवर भोंगा वाजताच त्यासमोर हनुमान चालिसा लावली. राज्यात काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यातसुद्धा घेतलं. दरम्यान, शिर्डीत जामा मशिदीत पहाटेच्या अजानवेळी लाऊड स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जामा मशिदीच्या विश्वस्तांनी शिर्डीत साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नयेत अशी विनंती केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

“आम्ही अजानसाठी भोंगे लावणार नाही, पण साईबाबांची आरती मात्र भोंग्यावरून सुरु राहुदे” अशी भूमिका जामा मशिदीच्या विश्वस्तांनी घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना निवेदन दिलं आहे. “शिर्डी सर्व धर्म समभावाचं प्रतिक आहे. राज्यात भोंग्याचा विषय तापला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण काकड आरती, शेजारतीच्या वेळेत भोंगे बंद करण्यात येऊ नयेत”, असं जामा मशिदीच्या ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांनी म्हटलं आहे. साई मंदिरात काकड आरती, शेजारती भोंग्यावरच व्हावी अशी मागणी शिर्डीतील मुस्लिम समाजाने केली आहे.

साईबाबांची काकड आऱती पहाटे होते, तर रात्री साडेदहा वाजता शेजारती होते. पोलिसांनी साईबाबा संस्थानला सकाळी ६ ते रात्री दहा या वेळेतच लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे. त्यामुळे ४ मे रोजी पहाटे पाच वाजता होणाऱ्या काकड आरतीवेळी स्पीकर बंदच होता. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचं साई संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

मंदिरात पहाटे पाच वाजता भुपाळी रेकॉर्ड सुरु होते, त्यानतंर पहाटे सव्वा पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. तर ५.५० वाजता मंगलस्नान होते. रात्री दहा वाजता शेजारती सुरु करण्यात येते. ४ मेपूर्वी या सर्व वेळेत आरत्या साई मंदिर आणि परिसरात लावण्यात आलेल्या स्पीकरवरून ऐकवण्यात येत होत्या.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या