मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : ..तर त्यांना एखादी खातं देऊ, फडणवीसांचे पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत

Devendra Fadnavis : ..तर त्यांना एखादी खातं देऊ, फडणवीसांचे पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत

Aug 14, 2022, 07:42 PM IST

    • शिंदे मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, त्यांना आमच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिंदे मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, त्यांना आमच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ

    • शिंदे मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, त्यांना आमच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. विस्तारानंतर आठवडा उलटल्यानंतर रविवारी अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज पार पडले.  मंत्रिमंडळ खातेवाटप (ministers portfolio) ५ मंत्री नाराज असल्याच्या व त्यातील एकाचा फोन स्वीच ऑफ येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले की, आमच्यात खाते वाटपासंदर्भात कोणताही वाद नाही. त्यामुळे त्यांना आमच्याकडील एखादे खाते (Maharashtra Ministers Portfolio) हवे असल्यास, आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडे एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते मागून घेऊ. 

फडणवीस म्हणाले की, आजच्या खातेवाटपात जी अधिकची खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि जी आमच्याकडे आहेत. ती साधारणपणे त्याच्या पक्षांकडेच असतात. पण, अगदीच तसेच नाही, त्यांना वाटले आमच्याकडे एखादे खाते त्यांना हवे आहे, तर आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडे एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते घेऊ. आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत. त्या दृष्टीने, सध्या तरी असे वाटते, की पुढील विस्तारात त्यांच्याकडची खाती ते त्यांच्या लोकांना देतील आणि आमच्याकडची खाती आम्ही आमच्या लोकांना देऊ. मात्र, त्यात काही बदल करायचा असेल, तर तसे आम्ही बसून त्यावर चर्चा करू. 

पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, या प्रश्नावर म्हणाले विस्तार कधी करायचा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना आहे. योग्य वेळ पाहून ते ठरवतील.

पुढील बातम्या