मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim News : धक्कादायक ! लाइट गेल्याने सरकारी दवाखान्यात मोबाईल टॉर्चच्या उजेडात डॉक्टरांनी केले तब्बल १० ऑपरेशन्स

Washim News : धक्कादायक ! लाइट गेल्याने सरकारी दवाखान्यात मोबाईल टॉर्चच्या उजेडात डॉक्टरांनी केले तब्बल १० ऑपरेशन्स

Dec 31, 2022, 09:36 PM IST

    • washim News : वाशिममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील आरोग्यवर्धनी केंद्रात लाइट गेल्याने मोबाइलच्या उजेडात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.
Washim News

washim News : वाशिममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील आरोग्यवर्धनी केंद्रात लाइट गेल्याने मोबाइलच्या उजेडात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.

    • washim News : वाशिममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील आरोग्यवर्धनी केंद्रात लाइट गेल्याने मोबाइलच्या उजेडात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.

वाशिम : वाशिम शहरात असलेल्या राजाकिन्ही आरोग्यवर्धनी केंद्रातून एक गंभीर प्रकार घडला आहे. या रुग्णालयातील लाइट गेल्याने मोबाइलच्या टॉर्चमध्ये तब्बल १० महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. रुग्णालयात बॅकअप म्हणून जनरेटर देखील नसल्याचा प्रकार पुढे आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

वाशिम येथे राजाकिन्ही आरोग्यवर्धनी आहे. या रुगाणल्यात आज १० कुटुंबनियोजणाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतांना अचानक लाइट गेली. यामुळे गोंधळ उडाला. रुग्णालयात जनरेटर देखील नसल्याने डॉक्टरांनी अखेर मोबाइल काढले आणि टॉर्च सुरू करत तब्बल १० शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.

या केंद्रात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. दरम्यान, एखाद्या इमरजन्सीच्या वेळेस लाइट गेल्यास रुग्णाच्या जिवावर देखील बेतू शकते. मात्र, या प्रकरणात डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत या शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने त्यांचे कौतुक जारी होत असले तरी या केंद्राची अवस्थाच सलाईनवर असल्यासारखी आहे.

 

एकीकडे राज्यातील आरोग्य वर्धिनी सरकार बळकट करण्याच्या विचारात आहेत. यसाठी लाखो रुपयांचा निधी हा देण्यात येत आहेत. त्यात जर या पायाभूत सुविचाच नसतील तर आरोग्य यंत्रणा कशी बळकट होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या